MP Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला फडणवीसांची दांडी; चर्चांना उधाण

Kalyan Dombivli Political News : या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 8 तारखेला सहभागी होणार अशी चर्चा रंगली होती.
MP Shrikant Shinde
MP Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान-

Kalyan Dombivli : डोंबिवली लगत असणाऱ्या मलंगगडाच्या पायथ्याशी गेल्या आठ दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह हा कार्यक्रम रंगला आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आहेत. या कार्यक्रमाला सोमवारी म्हणजेच सोमवारी (ता.8) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याने वारकरी संप्रदायाच्या इतक्या मोठ्या सोहळ्याला ते अनुपस्थित कसे अशा चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. श्रीकांत शिंदेना पुन्हा मतदारांचा कौल मिळावा यासाठी कल्याण लोकसभा मतदार संघात विविध कार्यक्रमांचे आयोजन, विकासकामांचे उद्घाटन अशा गोष्टी शिंदे गटाकडून करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MP Shrikant Shinde
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा सामंतांना आधी जाब, नंतर पाठबळ... म्हणाले, 'किती फोन केले...'

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हजर होते. यावेळी मलंगगड पायथ्यापासून उसाटणे गावापर्यंत रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. पंढरपूरसारखे रिंगण तयार केले होते. त्यात घोडे देखील नाचवले. त्यानंतर अखंड आठ दिवस तेथे प्रवचन सुरू होती. खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्घाटनानंतरही स्वतः जातीने या कार्यक्रमाकडे लक्ष दिले आहे.

देवेंद्र फडणवीस अनुपस्थित...

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आठ तारखेला सहभागी होणार अशी चर्चा रंगली होती. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील त्याची पुष्टी केली होती. त्यानुसार नियोजनही लावले गेले. मात्र प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक सुरू असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. विशेष म्हणजे डोंबिवलीचे आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वारकरी संप्रदाय खासदार शिंदेवर खुष...

या कार्यक्रमाचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमात वारकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यामुळे हा असा सुंदर कार्यक्रम पार पडला अशा भावना ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत नक्कीच फायदा होणार अशी चर्चा रंगलेली पाहिला मिळाली.

(Edited By Deepak Kulkarni)

MP Shrikant Shinde
Maharashtra Political Breaking : निकालाआधीची सर्वात मोठी बातमी! शहा- शिंदेंची रविवारी रात्री मुंबईत गुप्त भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com