Baba Siddque  Sarkarnama
मुंबई

Baba Siddique Murder Updates : बाबा सिद्दीकींची हत्या झाली तेव्हा तिथे किती पोलिस होते? वाय दर्जाच्या सुरक्षेचे काय झाले?

Baba Siddique Murder Police y security : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, तीन पोलिस कर्मचाही हे बाबा सिद्दीकींच्या सुरक्षेसाठी तैनात होते.

Roshan More

Baba Siddique Murder Updates : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वी हत्येची धमकी देण्यात आली होती. तसेच त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची चर्चा होती.

बाब सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती का? तसेच त्यांच्या सुरक्षेमध्ये किती पोलिस होते? याची माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, तीन पोलिस कर्मचाही हे बाबा सिद्दीकींच्या सुरक्षेसाठी तैनात होते. बाबा सिद्दिकी यांना कॅटेगेराईज सुरक्षा नव्हती अर्थातच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती.

सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दोन आरोपींना घटनास्थळावरून पळ काढताना पकडण्यात आले. तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. दोन आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 28 काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. मात्र, यामागे बिश्नोई गँगचा हात आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच या बिश्नोई गँगने सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे तिची देखील सत्यता तपासण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.

फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी

बाब सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे.

गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT