Devendra Fadnavis: "लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढील एक महिनाच..." राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis On Raj Thackeray : "लाडकी बहीण योजना पाच वर्ष चालणार आहे. या योजनेसाठी लागणारा निधी सरकारने तयार करून ठेवला आहे. त्यामुळे विरोधक काही बोलत असले, तरी देखील ही योजना निरंतर सुरू राहणार आहे. अनेक लोक वल्गना करत आहेत योजनेबद्दल चुकीचं सांगत आहेत."
Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाशाही युती-आघाडी न करता स्वबळावर लढण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. रविवारी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी याबाबतची घोषणा केली.

शिवाय या मेळाव्यात त्यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर हल्लोबोल केला. तसंच महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढील एक महिनाच मिळतील, पण त्यानंतर पैसे मिळणार नाहीत. ते पैसे पुढील दोन महिन्यात बंद होतील, असं त्यांनी म्हटलं होतं.

राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "लाडकी बहीण योजना पाच वर्ष चालणार आहे. या योजनेसाठी लागणारा निधी सरकारने तयार करून ठेवला आहे. त्यामुळे विरोधक काही बोलत असले, तरी देखील ही योजना निरंतर सुरू राहणार आहे.

अनेक लोक वल्गना करत आहेत योजनेबद्दल चुकीचं सांगत आहेत. मात्र, या योजनेसाठी लागणारे सर्व पैसे बजेटमध्ये ठेवले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना आताही चालणार, पुढेही चालणार आहे, आणि पुढचे पाचही वर्ष टिकणारही आहे." असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Kapil Patil on Kisan Kathore : 'हिंमत असेल तर अपक्ष लढून दाखवा, मग..' ; कपिल पाटलांचं किसन कथोरेंना आव्हान?

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मेळाव्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, "मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजनाचे काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचेही पैसे येतील नंतर येणार नाहीत.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
CM Eknath Shinde News : `लाडकी बहीण` योजनेतून फक्त जनतेचे प्रेम मिळवायचयं..

हे जे पैसे वाटणं सुरू आहे. त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल की या सरकारकडे लोकांचे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकटं, महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे, त्या बळकट आहेत, त्यांच्या हाताला काम द्या, कोणी मागितले आहेत फुकटं पैसे?"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com