Baba Siddique : हल्लेखोरांची नाॅनस्टाॅप फायरिंगची तयारी? दोघा आरोपींकडून मोठ्या संख्येनं काडतूस जप्त

Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमधील आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची माहिती मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.
Baba Siddique
Baba Siddiquesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमधील आरोपींनी हल्ल्याची जोरदार तयारी केल्याचं आता समोर आलं आहे.

आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 28 काडतूस जप्त केल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या काडतुसांची संख्या पाहता बराच मोठा हल्ला करण्याच्या इरादा होता, असे आता सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री मुंबईतील वांद्रे इथं त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिष्णोई गँगने हत्येची जबाबदारी घेतली आहे. या हत्येमधील दोघा हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोघा आरोपींना मुंबई न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.

Baba Siddique
Varsha Gaikwad : 'सरकारमध्ये लाज नावाची गोष्ट उरली आहे का?'

डीसीपी दत्ता नलावडे म्हणाले, "बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा काही अंतरावर सहायक पोलिस (Police) निरीक्षक दाभाडे आणि त्यांचे सहकारी बंदोबस्तावर होते. हल्ला करताच त्यावेळी पोलिसांनी आरोपींमधील दोघांना शिताफीनं पकडले. यातील एक जण पसार झाला आहे. या दोघांकडून दोन पिस्तूल आणि 28 काडतूस जप्त करण्यात आली असून, त्या दोघांना 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे". या घटनेत लाॅरेन्स बिष्णोई गँगने हत्या केल्याचा अजून कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु त्याअनुषंगाने विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे, असेही दत्ता नलावडे यांनी सांगितले.

Baba Siddique
Raj Thackeray : महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण; ठाकरेंच्या निशाणावर भाजप आणि पवार

मिरची-स्प्रे करून हल्ल्याचा डाव

आरोपींकडून पिस्तुलासह मिरची-स्प्रे सुद्धा जप्त करण्यात आला आहे. सुरवातीला ते बाबा सिद्दिकी यांच्या तोंडावर मिरची-स्प्रे करणार होते, त्यानंतर गोळीबार करणार होते. पण तिसऱ्या आरोपी शिवकुमार गौतम याने बाबा सिद्दिकी समोर येताच, त्यांच्यावर थेट गोळीबार केला. बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस दलाकडून तीन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरक्षेवर असताना देखील ते तिघे काहीच करू शकले नाही. या गोळीबार आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com