Baba Siddique Sarkarnama
मुंबई

Baba Siddique : 48 वर्ष काँग्रेस तर आठ महिने अजितदादांसोबत; बॉलिवूडशी संबध, कोण होते बाबा सिद्दीकी

Baba Siddique Shot Dead : गेली 48 वर्ष त्यांनी काँग्रेससोबत निष्ठेने काम केले होते. शनिवारी रात्री बांद्रा पूर्वेत खेरवाडीत तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Sachin Waghmare

Mumbai News : माजी मंत्री असलेले बाबा सिद्दीकी हे गेली 48 वर्ष काँग्रेससोबत होते. सिद्दीकी यांनी आठ महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सिद्दीकी यांनी 10 फेब्रुवारी 2024 ला काँग्रेसचा राजीनामा देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. गेली 48 वर्ष त्यांनी काँग्रेससोबत निष्ठेने काम केले होते. शनिवारी रात्री बांद्रा पूर्वेत खेरवाडीत तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्ती केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या (Congress) समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. (Baba Siddique News )

कोण आहेत बाबा सिद्दीकी

मुंबई काँग्रेसमधील बाबा सिद्दीकी मोठे नेते होते. मुस्लिम चेहरा म्हणून ते राजकारणात प्रसिद्ध आहेत. तीन वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले.

तीन टर्म होते आमदार

त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

सिद्दीकी बिहारचे पण राजकीय कारकीर्द मुंबईत

बाबा जियाउद्दीन सिद्दीकी हे मूळचे बिहारमधील आहेत. परंतु त्यांनी राजकीय कारकीर्द मुंबईत केली. त्यांचे चिरंजीव जिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत, तर त्यांची मुलगी अर्शिया सिद्दीकी या डॉक्टर आहेत तर पत्नी शहजीन गृहिणी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT