Baba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर

Firing on baba Siddique : वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथे बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन ते चार तरुणांकडून गोळीबार करण्यात आला.निर्मल नगर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
Baba Siddique
Baba SiddiqueSarkarnama
Published on
Updated on

Baba Siddique News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन ते चार तरुणांकडून गोळीबार करण्यात आला. लिलावती रुग्णालयात बाबा सिद्धीकी यांना दाखल करण्यात आले असून त्यांना एक गोळी लागल्याची माहिती आहे.

निर्मल नगर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बाबा सिद्धीचे हे काँग्रेसचे नेते होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. मुंबईमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली होती.

बाबा सिद्धिकींवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी लिलावती रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डाॅक्टारांशी फोनवर चर्चा करत बाबा सिद्धिकींच्या तब्बेतीची चौकशी केली आहे.

Baba Siddique
Sanjay Raut Dasara Melava News : `आदित्य ठाकरे आता तुम्ही लहान बाळ राहिला नाहीत`.. संजय राऊत असं का म्हणाले?

सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून सध्या दोन्ही आरोपींना खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

1999, 2004 आणि 2009 असे तीनवेळा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 2004 ते 2008 दरम्यान त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. म्हाडाच्या मुंबई विभागाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. 2014 मध्ये भाजपचे आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला होता.

Baba Siddique
Dasara Melawa News : हे सरकार पुन्हा डोक्यावर आलं तर मंत्रालयही गुजरातला नेतील!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com