Bacchu Kadu Sarkarnama
मुंबई

Bachchu Kadu News : मंत्रिपदावरून बच्चू कडूंची नाराजी कायम; म्हणाले, ‘जेवणाचं आमंत्रण जेवल्याशिवाय....’

Bachchu Kadu Is Not Happy With Ministership: मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. कुणालाही मंत्री करा; पण विस्तार होणे गरजेचे आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : जेवणाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. त्याप्रमाणे मंत्रिपदाची लालसा नाही; पण मंत्रिमंडळाचा विस्तार करा, अशी मागणी करत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. (Bacchu Kadu's displeasure again over ministership)

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Cabinet expansion) चर्चा राज्यात सुरू आहे. त्यात अचलपूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे नाव पुन्हा मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी जेवणाच्या आमंत्रणावरून मंत्रीपदाबाबत मिळणाऱ्या हुलकावणीबाबत नाराजी व्यक्त केली.

बच्चू कडू म्हणाले की, जेवणाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. घोडाबाजार आत जवळच आहे. मंत्री नसलो तरी सध्या आम्ही काम करतच आहोत. मंत्री असल्यावर आम्ही काम करतो का. मंत्री नसलो तरी अधिक वेगाने काम करत राहू. मंत्रीपदाचा आम्हाला लालचा नाही. पण, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. कुणालाही मंत्री करा; पण विस्तार होणे गरजेचे आहे.

प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळावा, अशी जनतेची मागणी आहे. त्यासंदर्भात शिंदे सरकार निश्चितच विचार करेल आणि मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करेल, असे मला वाटते, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

केंद्राकडून संविधानाचा गैरवापर केला जात आहे, या शिवसेनेच्या आरोपावर बच्चू कडू म्हणाले की, असं वारपांगी बोलण्यात काही अर्थ नसतो. संविधानाच्या कोणत्या कलमाला हात लावला. कोणत्या कलमाला आपण अडचण निर्माण केली. कोणत्या कलमाचे उल्लघंन केले, हे स्पष्ट लिहिण्याची गरज असते. मोघम लिहिण्यात काही अर्थ नसतो. शिवसेना नेत्यांनी बोट दाखवून कोणत्या कलमाचे उल्लंघन झाले आहे, हे बोलले पाहिजे. शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी असं मोघम बोलणं काही चांगलं नाही, असा टोलाही बच्चू कडू यांनी संजय राऊत यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT