Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपद नको रे बाबा...! : पराभवाच्या भीतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांचा हायकमांडला नकार

सन २००४ पासून विधानसभेचे अध्यक्ष झालेल्या नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
Karnataka Assembly
Karnataka Assembly Sarkarnama

बंगळूर : कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेसचे वरिष्ठ नेते विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. कारण, कर्नाटकात विधानसभा अध्यक्ष झालेले जवळपास सर्वच नेते निवडणुकीत पराभूत झाले असून त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. मागील भाजप सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष झालेले विश्वेश्वर हेगडे हे कागेरी यांचा नुकताच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाने पक्षाला धक्का बसला आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद स्वीकारल्यास आपली राजकीय कारकिर्द धोक्यात येण्याची भीती आमदारांना वाटत असल्याचे दिसून येत आहे. (Senior Congress MLAs in Karnataka refuse to become Assembly Speaker)

सन २००४ पासून विधानसभेचे अध्यक्ष (Assembly Speaker) झालेल्या नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. एस. एम. कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील २००४ मधील काँग्रेस (Congress) सरकारमध्ये अध्यक्ष झालेले केआर पेठचे आमदार कृष्णा २००८ च्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर २०१३ मध्ये अध्यक्षपद भूषवणारे ज्येष्ठ काँग्रेस सदस्य कागोडू थिम्मप्पा नंतरच्या २०१८ च्या निवडणुकीत पराभूत झाले. सन २०१६ मध्ये विधान सभाध्यक्ष झालेले व पाचवेळा विधानसभा सदस्य असलेले के. बी. कोळीवाड हे २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभूत झाले.

Karnataka Assembly
Sameer Wankhede News : ‘भागवतांच्या भेटीनंतरच वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा का? : दाल में कुछ काला है...’

काँग्रेस-धजद युतीच्या २०१८ च्या सरकारमध्ये अध्यक्ष असलेले रमेश कुमार १० मे रोजी झालेल्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे या पदावर नेत्यांना सामावून घेणे काँग्रेसला अवघड झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांची सोमवारपासून तीन दिवस होणाऱ्या पहिल्या सत्रात हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

Karnataka Assembly
Karjat Bazar Samiti : फेरमतमोजणीत भाजप तोंडघशी : कर्जतमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे गटाला ९ जागा कायम

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, डॉ जी. परमेश्वर यांनी विधानसभा अध्यक्षपदाची थेट ऑफर नाकारली आणि कॅबिनेट मंत्री बनले आहेत. टी.बी. जयचंद्र, एच. के. पाटील, बी. आर. पाटील आणि वाय. एन. गोपालकृष्ण यांच्या नावाचा पक्षात विधानसभा अध्यक्षपदासाठी विचार सुरू आहे. मात्र, यापैकी कोणीही या पदासाठी इच्छुक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Karnataka Assembly
Vasantrao Kale Sugar Factory Election: कल्याणराव काळेंना पहिला धक्का; दीपक पवार, बी. पी. रोंगे यांचे अर्ज मंजूर

भाजपकडून २०१९ च्या पोटनिवडणुकीत लढलेले जयचंद्र यावेळी विजयी झाले. एच. के. पाटील हे गदग येथील प्रमुख लिंगायत नेते असून मंत्रिमंडळासाठी त्यांचा विचार केला जात आहे. तसेच, बी. आर. पाटील हे देखील आळंद मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि भाजप सरकारमध्ये स्पीकर असलेले के. जी. बोपय्या यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला. ज्या नेत्यांना या पदाची ऑफर दिली जात आहे, त्या सर्व नेत्यांना सभाध्यक्ष होण्याऐवजी आमदार म्हणून राहायचे आहे, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com