Akluj Bazar Samiti : अकलूजमध्ये पुन्हा मोहिते पाटील; मदनसिंहांकडे सलग चौथ्यांदा बाजार समितीची धुरा; पांढरेंना एकनिष्ठेचे फळ

Akluj Bazar Samiti Sabhapati Election: स्थापनेपासून मोहिते पाटील कुटुंबीयांकडे बाजार समितीची धुरा आहे.
Akluj Bazar Samiti
Akluj Bazar Samiti Sarkarnama
Published on
Updated on

अकलूज (जि. सोलापूर) : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मदनसिंह मोहिते-पाटील, तर उपसभापतीपदी बापूराव पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्थापनेपासून बाजार समिती मोहिते पाटलांच्या ताब्यात असून मदनसिंह यांच्यावर सलग चौथ्यांदा बाजार समितीची धुरा सोपविण्यात आली आहे. (Madansinh Mohite-Patil as Chairman of Akluj Bazar Samiti)

अकलूज (Akluj) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर सभापती (Sabhapati) निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

Akluj Bazar Samiti
Neera Bazar Samiti : अजितदादांकडून निष्ठावंतास न्याय : नीरा बाजार समिती सभापतीपदी जगताप बिनविरोध; उपसभापतीवरून घोळ

या बैठकीत सभापतीपदासाठी मदनसिंह मोहिते पाटील यांचा अर्जावर सूचक म्हणून शहाजीराव देशमुख, अनुमोदक म्हणून बाळासाहेब आणि देशमुख हे होते. उपसभापतीपदासाठी बापूराव पांढरे यांच्या अर्जावर सूचक म्हणून लक्ष्मण पवार, तर अनुमोदक संदीप पाटील हे होते. सभापती व उपसभापतिपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल. शिंदे यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

Akluj Bazar Samiti
Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपद नको रे बाबा...! : पराभवाच्या भीतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांचा हायकमांडला नकार

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी १९४९ मध्ये स्थापन केलेल्या अकलूज कृषी उत्पन्न समितीच्या सभापतीपदी मदनसिंह मोहिते पाटील यांची सलग चौथ्यांदा, तर बापूराव पांढरे यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. स्थापनेपासून मोहिते पाटील कुटुंबीयांकडे बाजार समितीची धुरा आहे. समितीने स्वतःची जागा, व्यापारी संकुले, पेट्रोल पंप अशी विविध शेतकरी व व्यापाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीने आजपर्यंत शेतकरी व व्यापारी हिताचेच निर्णय घेऊन प्रगती केली आहे. भविष्यातही गॅस पंप, कोल्ड स्टोरेज, बेदाणा मार्केट याचबरोबर अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

Akluj Bazar Samiti
Karjat Bazar Samiti : फेरमतमोजणीत भाजप तोंडघशी : कर्जतमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे गटाला ९ जागा कायम

मोहिते-पाटील विरोधकांशी रणांगणात उतरून लढणारा नेता

अकलूज बाजार समितीच्या उपसभापतीपदी नातेपुते येथील मामासाहेब पांढरे यांची एकमताने निवड झाल्याबद्दल नातेपुते पंचक्रोशीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मामासाहेब पांढरे हे मोहिते-पाटील परिवाराशी एकनिष्ठ असून त्यांना या एकनिष्ठतेचे फळ मिळालेले आहे. यापूर्वीही त्यांनी उपसभापतीपदी म्हणून गेली पाच वर्षे काम केले आहे. माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील विरोधकांशी वेळप्रसंगी रणांगणात उतरून लढण्याची त्यांची तयारी असते. तसेच, अतिशय निःस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. नातेपुते नगरपंचायतचे ते नगरसेवक असून येथील नातेपुते एज्युकेशन सोसायटीमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com