Hitesh Jadhav during his formal entry into the BJP in the presence of party leaders. sarkarnama
मुंबई

Bachchu Kadu Vs BJP : भाजपचा बच्चू कडूंना धक्का, 'प्रहार'चा जिल्हाध्यक्ष फोडला!

Bachchu Kadu Hitesh Jadhav BJP : बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

संदिप पंडित

Palghar Politics : बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे पालघर जिल्हा आणि वसई विरारचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रहार संघटनेचे मुख्य कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ कडू यांना मोठा धक्का मानला जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने शहरात स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून अन्य पक्षातील प्रमुख नेते व पदाधिकारी आपल्याकडे कसे यावर अधिक भर दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यापूर्वी भाजपाने बहुजन विकास आघाडीला धक्का देत नऊ माजी नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. या पक्ष प्रवेशावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, वसई विरार निवडणूक प्रभारी व आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, मनोज बारोट,महेंद्र पाटील यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हितेश जाधव व त्यांच्या सहकारी चांगलेच सक्रिय होते. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी संघटनेने केलेली आंदोलने, महामार्गा रोको यासह अन्य आंदोलने यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष ही चांगलाच चर्चेत आला होता. मात्र आता मुख्य कार्यकर्त्यांनी साथ सोडली असल्याने सद्यस्थितीत बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष जिल्ह्यातून हद्दपार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT