Jaykumar Gore : जयकुमार गोरेंना मोठा दिलासा, कोर्टाची व्हिडिओ करणाऱ्याला ताकीद; वादग्रस्त भाग वगळण्याची सूचना ...

Bombay High Court News : वाजवी टीका ही देशातील लोकशाहीचा आधार आहे. मात्र टीका करताना अपमानास्पद भाषा टाळायला हवी, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणारे सहा व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी खंडपीठाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी वाजवी टीका ही देशातील लोकशाहीचा आधार आहे. मात्र टीका करताना अपमानास्पद भाषा टाळायला हवी, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्यासोबतच 'त्या' सहा व्हिडिओंमधील वादग्रस्त भाग वगळून उर्वरित व्हिडिओ पुन्हा प्रसिद्ध करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar gore) विरुद्ध पत्रकार तुषार खरात या प्रकरणात न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खरात यांनी केलेले सहा व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी गोरे यांच्यातर्फे करण्यात आली. संबंधित व्हिडिओंमधील वादग्रस्त भाग वगळण्याची सूचना न्यायालयाने केली. त्यामुळे मंत्री जयकुमार गोरेंना मोठा दिलासा लाभला आहे. त्यासोबतच कोर्टाने व्हिडिओ करणाऱ्या पत्रकारला ताकीद दिली असून या व्हिडीओमधून वादग्रस्त भाग वगळण्याची सूचना केली आहे.

Jaykumar Gore
BJP Politics : प्रज्ञा सातवांचा राजीनाम्याने मोठा ट्विस्ट, काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद हुकणार! भाजपचे एक दगडात दोन पक्षी...

वाजवी टीका ही देशातील लोकशाहीचा आधार आहे. मात्र टीका करताना अपमानास्पद भाषा टाळायला हवी, असे मत व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाने त्यासोबतच या सहा व्हिडिओमधील वादग्रस्त भाग वगळून उर्वरित व्हिडिओ पुन्हा प्रसिद्ध करण्यासही परवानगी दिली आहे.

Jaykumar Gore
Shivsena News: तनवाणींच्या दबावतंत्रानंतर संजय शिरसाटांची खेळी! तनवाणींसह जैन यांचा मुख्य समन्वय समितीत समावेश!

'देशात कायद्याचे राज्य आहे. एखादी चुकीची घटना घडल्यास त्याची दखल घेण्यासाठी सक्षम यंत्रणा आणि न्यायालये आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये', असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, त्या सहा व्हिडिओंमधील काही भाषा प्रथमदर्शी बदनामीकारक आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Jaykumar Gore
NCP Politics : महापालिकेपूर्वीच महायुतीत तणाव? दादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळावर नारा

दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध पत्रकार तुषार खरात या प्रकरणात आता पुढील सुनावणी 19 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. त्यामध्ये या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची 85 हून अधिक एकतर्फी बातम्यातून बदनामी करण्यात आल्याचा ठपका पत्रकार तुषार खरात यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी खरात यांना 10 मार्च 2025 रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती.

Jaykumar Gore
Congress Politics : आणखी एका राज्यात काँग्रेसची सत्ता पक्की? ‘या’ निवडणुकीत भाजपसह विरोधकांना दिला झटका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com