Bacchu Kadu Sarkarnama
मुंबई

Bacchu Kadu News : मंत्रीपद गमावलेल्या बच्चू कडूंना आता हवीय मंत्रालयातच जागा

Ministry of Disability : अपंग मंत्रालयासाठी मित्तल टॉवरमध्ये जागा

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu Demands Office in Mantralay : राज्य सरकारने देशातील पहिले अपंग मंत्रालय सुरू केले असले तरी मात्र या मंत्रालयाचा कारभार चालवण्यासाठी अद्यापही कार्यालयाचे शोध सुरू आहे. या मंत्रालयाचा पदभार दिलेल्या आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातच या कारभारासाठी कार्यालय देण्याचा हट्ट राज्य सरकारकडे धरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बच्चू कडू आणि राज्य सरकारमधील नाराजी समोर आली आहे. (Latest Marathi News)

अपंग मंत्रालय सुरू करण्याच्या अटीवरच आमदार बच्चू कडू यांनी तत्कालीन ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देतानाही त्यांनी हीच मागणी लावून धरली होती. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने बच्चू कडू यांची मागणी पूर्ण करत राज्यात अपंग मंत्रालय सुरू केले आहे. मात्र त्यासाठी योग्य जागा देत नसल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Mantralay News)

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. तसेच मंत्रालयात अपंग येणाऱ्या व्यक्तींनाही कामासाठी सोपी व्हावे याकरिता हे अपंग मंत्रालय हे मंत्रालयातच हवे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी सातत्याने बोलताना व्यक्त केली आहे. अपंगाला येण्याकरिता मित्तल टॉवर दूर पडते. या ठिकाणाचा शोध घेताना अपंग व्यक्तिंना त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय मंत्रालयात आले तर राज्यातून येणाऱ्या अपंग बांधवांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे मंत्रालयातच कार्यालय देण्याची भूमिका आमदार बच्चू कडू यांनी तीव्र केली आहे.

राज्य सरकारकडून या मंत्रालयाचा कारभार चालवण्यासाठी मित्तल टॉवरमध्ये जागा दिली आहे. या कार्यालयाचे कामही सुरू झाले आहे. जवळपास ५० ते ६० टक्के कार्यालयाचे कामकाज पूर्ण झाले आहे. दरम्यान, बच्चू कडू काही काळ मुंबईत आले तर त्या ठिकाणी बसतात. मात्र बच्चू कडू यांनी ते कार्यालय मंत्रालयातच हवे, यासाटी मंत्रालयात जागा शोधण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुसरा किंवा सहाव्या मजल्यावर या मंत्रालयाच्या कार्यालसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यांच्यासाठी अद्यापही जागा शिंदे-फडणवीस सरकारकडून मिळाली नाही आहे.

बच्चू कडू आणि राज्य सरकारमधील वाद कोणत्या ना कोणत्या कारणाने समोर येतच आहे. बच्चू कडू हे मागील सरकारमध्ये राज्यमंत्री होते. शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार झाल्यास ते पुन्हा मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना राज्य मंत्री पदावरून कॅबिनेट मंत्री देण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही राज्य मंत्रिमंडळता विस्तार झाला नाही. याबाबत कडू यांनी वारंवार आपली नाराजीही व्यक्त केलेली होती. त्यानंतर त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. आता मात्र कार्यालय मिळत नसल्याने ते नाराज असल्याची देखील बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT