Sangli Congress And NCP Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यातील ४८ मतदारसंघाचा आढवा घेतला आहे. यावेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या अनेक जागांवर दावा सांगितला आहे. दरम्यान, काँग्रेसने सांगलीत नवी खेळी केली आहे. यामुळे प्रचारात आक्रमक असलेल्या भाजपला प्रत्युत्तर देतानाच राष्ट्रावादी काँग्रेसलाही शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. (Latest Marathi News)
कर्नाटक राज्यात काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सत्कारानिमित्त रविवारी (ता. २५) सांगलीत आमंत्रित करण्यात आले आहे. यातून काँग्रेसने आतापासूनच निवडणुकीसाठी मोर्चाबांधणी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे सांगलीत काँग्रेसला फटका बसला होता. काँग्रेसकडून प्रतिक पाटील मैदानात होते. जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोडीचा फायदा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या खासदार संजयकाका पाटील यांना झाला.
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सत्काराच्या माध्यमातून काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सांगलीत काँग्रेस एंकसंघ असल्याचा प्रयत्न होईल. त्यानंतर काँग्रेसमधील सर्व गट शेवटपर्यंत एकत्र राहणार का? सांगलीत राष्ट्रवादीमागे सुरू असलेली काँग्रेसची फरफट थांबणार का, आदी अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
आता सांगलीच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यानंतर काँग्रेसला जाग आल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत प्रतिक पाटील यांनी उमेदवारीसाठी आग्रहच धरला नाही. विशाल पाटील यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारीसाठी आक्रमक झाले. तोपर्यंत सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्यात आली. दरम्यान, विधानसभा की लोकसभा कुठली निवडणूक लढवायची या विचारात असलेले विशाल पाटील सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहेत.
असे आहे सांगलीचे संख्याबळ
लोकसभा मतदारसंघातील सहापैकी दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. तर सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व कदम गटाकडे होते. राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील या एकमेव आमदार आहेत. तर सांगली व मिरज मतदारसंघ भाजपकडे आणि खानापूर-आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.