Badlapur Crime News .jpg Sarkarnama
मुंबई

Badlapur Crime Case: बदलापूर पुन्हा एकदा हादरलं, गोरगरीब महिलांच्या अंडाशयाचीच तस्करी; 3 महिलांना ठोकल्या बेड्या

Badlapur News: बदलापूरमध्ये महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केल्याप्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर उघडकीस आला आहे.

Deepak Kulkarni

Badlapur News: बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. चिमुरडी अत्याचार प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक व तितकाच संतापजनक प्रकार बदलापूरमध्ये समोर आला आहे. गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवत त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बदलापूरमध्ये महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केल्याप्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर उघडकीस आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रं फिरवली. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्युवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर, उल्हासनगरमधील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघींनाही बेड्या ठोकल्या आहेत.

त्यांच्याकडून बदलापूर पोलिसांनी आरोपी सुलक्षणा गाडेकरच्या घरी छापेमारीची कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी महिलांच्या गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या सुलक्षणा गाडेकर, उल्हासनगरमधील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे यांसह सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून यात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित महिला आरोपी सुलक्षणा गाडेकर ही गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून इंजेक्शन्स देत होती. महत्त्वाची बाब म्हणजे ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे महिलांची सोनोग्राफीही करवून घेत होती. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर या महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवण्यात येत होतं. त्याठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढण्यात येत होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT