Briyani Scam News: संपूर्ण देश हादरला...! बिर्याणीची ऑर्डर अन् सुमारे 70 हजार कोटींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश

Tax Evasion Scam News: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून या घोटाळ्याची गंभीर दखल घेण्यात आली असून लवकरच याप्रकरणी नोटिसा आणि दंड जारी केले जाण्याची शक्यता आहे. इतर राज्यांमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं तपासाचा वेग वाढवल्याची माहिती समोर येत आहे.
Biryani Scam  (1).jpg
Biryani Scam (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील हजारो कोटींच्या अनेक घोटाळ्यांनी आत्तापर्यंत मोठा हाहा:कार उडवल्याचं दिसून आलं आहे. तसेच दुसरीकडे टॅक्स चोरीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं वास्तव आहे. अशातच आता हॉटेल क्षेत्रातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिर्याणी ऑर्डरच्या काळाबाजारचा सरकारला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

देशातील तब्बल 70 हजार कोटींच्या टॅक्स चोरीच्या प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे. या महाघोटाळ्याची सुरुवात हैदराबाद शहरात नोव्हेंबर 2025 मध्ये झाली.आयकर विभागानं केलेल्या छापेमारीच्या कारवाईतून 3 लोकप्रिय बिर्याणी चेनवर तब्बल 30 ठिकाणी मोठी कारवाई केली होती. त्यात हॉटेलची मुख्य कार्यालयांसह संबंधित वरिष्ठ व्यवस्थापनाच्या घरांचाही समावेश असल्याचं समोर आलं होतं.

इन्कम टॅक्स विभागाच्या या छापेमारीच्या कारवाईत डिजिटल रेकॉर्ड्स आणि युपीआय (UPI) ट्रान्झॅक्शनच्या तपासणीतून आर्थिक गेरव्यवहारांचं मोठं कनेक्शन उघडकीस आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांतच इन्कम टॅक्स विभागाला तब्बल 5,000 कोटी रुपयांच्या बिर्याणींची विक्री लपवण्यात आल्याचं तपासात समोर आलं होतं.

संपूर्ण देशभरातील हॉटेल क्षेत्रालाच धक्का देणाऱ्या प्रकारानं इन्कम टॅक्स विभागही हादरला आहे. सध्या आयकर विभाग हे डिलीट केलेले सर्व रेकॉर्ड्स पुन्हा मिळवण्याचे काम करत असून, लवकरच संबंधित मालकांवर मोठी दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर खटले भरले जाण्याची शक्यता आहे.

Biryani Scam  (1).jpg
Narayan Rane News: मोठी बातमी: नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, जुनं प्रकरण पुन्हा तापलं; ठाकरेंच्या नेत्यानं कोर्टाला थेट पुरावेच दिले

समोर आलेल्या माहितीनुसार, 2019 पासून 1 लाख 77 हजार रेस्टॉरंट्समधील बिलिंग डेटाच्या तपासणीत सरासरी 27 टक्के विक्री दडपली जात होती असं समोर आलं आहे. यात आत्तापर्यंत सुमारे 70 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

या महाघोटाळ्यात तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक यांसह अनेक मोठ्या राज्यांचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासातून समोर येत आहे. कर्नाटक सरकारनं सुमारे 2000 कोटी तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमधून 5,000 कोटी रुपयांच्या बिर्याणींची विक्री लपवण्यात रुपयांचे व्यवहार हटवल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून या घोटाळ्याची गंभीर दखल घेण्यात आली असून लवकरच याप्रकरणी नोटिसा आणि दंड जारी केले जाण्याची शक्यता आहे. इतर राज्यांमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं तपासाचा वेग वाढवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडून पुनर्निर्मित बिलांची कर विवरणपत्रे आणि बँक रेकॉर्डशी जुळणी सुरू आहे.

Biryani Scam  (1).jpg
Bangladesh Connection : बुधवार पेठेतील अंधाऱ्या गल्लीतील ‘बाबू भैया’चं 20 वर्षांचं गुपित अखेर उघड, पुण्यात मोठा भांडाफोड!

बिर्याणीच्या माध्यमातून केंद्रासह अनेक राज्य सरकारच्या तिजोरीला हजारो कोटी रुपयांचा चुना लावला गेल्याचं समोर आल्यानं तपास यंंत्रणांनाही मोठा धक्का बसला आहे. विविध ठिकाणी तर एकाच पॅनकार्डवर 1 कोटी रुपयांहून अधिक बिर्याणीची विक्री लपवल्याचं पुरावे सापडले आहेत. 40 रेस्टॉरंट्सच्या नमुन्यात, सुमारे 400 कोटी रुपयांची अघोषित उलाढाल आढळून आली. काही ठिकाणी, सुमारे 25 टक्के विक्री दडपण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com