

New Delhi News: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला होता. यानंतर आता हा अपघात होता की घात यावरुन अनेक उलटसुलट दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याचदरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही सलग पत्रकार परिषदांचा धडाका लावत गंभीर आरोप करतानाच अजितदादांचा अपघात नाही,तर घातच झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सर्वात मोठी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शनिवारी (ता.21) राजधानी दिल्लीतच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचा राजीनामा घेण्याची मोठी मागणी केली. यासाठी ते मोदींनाही पत्र लिहिणार असल्याचं म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा विषय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यांनी हाती घ्यावा अशी विनंतीवजा मागणीही केली. तसेच व्हीएसआर कंपनी मालक आणि देशातील बड्या राजकारण्यांचे हितसंबंध असल्याचे आरोप केला होता. तर एक खासदार या कंपनीचा भागीदार असल्याच्या गंभीर आरोपाचा पुनरुच्चार करत पवार यांनी दिल्लीतून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, मंत्री राम नायडूंनी अपघाताच्या नंतर काहीवेळातच सुरुवातीला लिअर जेट विमान कंपनीला क्लीन चीट देणारं स्टेटमेंट केलं. नंतर सूत्रांच्या हवाल्यानं व्हीएसआर सोबत काही संबंध नसल्याचं म्हटलं. ज्यांनी व्हीएसआरला लोन दिलं ते तेलगू देसम पक्षाशी संबंधित आहेत, अशी माहितीही पवारांनी दिली आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्याकडे टीडीपीचे मंत्री नायडूंच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी करत असल्याचं रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. रोहित पवार आजही एका सादरीकरणाद्वारे अजित पवारांच्या मृत्यूविषयी नवे पुरावे, तांत्रिक माहिती व तपासासाठी काही महत्त्वाचे व धक्कादायक खुलासे केले.
यावेळी रोहित पवारांनी म्हणाले, व्हीएसआर या कंपनीच्या पाठीशी खूप मोठे लोक आहेत. सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे काही लोक या कंपनीच्या पाठीशी आहेत. या अपघातात व्हीएसआर जबाबदार आहे, तर त्यांना वाचवणे कटाचा भाग असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
तसेच व्हीएसआर नावाच्या विमान कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा खळबळजनक आरोपही रोहित पवार यांनी यावेळी केला.
रोहित पवार यांनी अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे असं म्हटलं आहे. कारण यात गुंतलेले इतर लोकही तितकेच प्रभावशाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.