Ujjwal Nikam sarkarnama
मुंबई

Ujjwal Nikam : 'पक्ष कोणताही असो सोडणार नाही', बदलापूर प्रकरणात अ‍ॅड. उज्वल निकमांनी काँग्रेस नेत्याला सुनावले

Badlapur Rape Case Ujjwal Nikam Vijay Wadettiwar: त्यांना वाटत असेल की आरोप केल्याने मी नर्वस होईल. तर त्यांनी ती कल्पना सोडून द्यावी. अशा आरोपांना मी कधीही भीक घालत नाही, असे उज्वल निकम म्हणाले.

Roshan More

Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची बदलापूर प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे. 'या वकिलांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर त्यासाठी जबाबदार कोण?' असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.वडेट्टीवार यांचा आरोपाला उज्वल निकम यांनी उत्तर दिले आहे.

'आरोपी कोणत्याही पक्षाचा असेल आणि हे तपास यंत्रणेला आढळून आले, तसे पुरावे असतील तर त्यांना कधीही सोडणार नाही.', असे अ‍ॅड. उज्वल निकम म्हणाले.

'त्यांना वाटत असेल की आरोप केल्याने मी नर्वस होईल. तर त्यांनी ती कल्पना सोडून द्यावी. अशा आरोपांना मी कधीही भीक घालत नाही. मी आजपर्यंत फक्त गुन्हेगारांच्या विरोधात लढलो आहे. त्यांचे सरकार असताना त्यांना मी चालत होतो. त्यांचेच मुख्यमंत्री माझी तेव्हा नियुक्ती करायचे. बदलापूर प्रकरणात माझी नियुक्ती झाली कारण आंदोलकांची ती मागणी होती. आणि त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिला.', असे उज्वल निकम म्हणाले.

मी पुन्हा माझ्या व्यवसायात

ही गोष्ट खरी आहे की मी भाजपकडून निवडणुकीसाठी उभा होतो. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या व्यवसायात आलो. आजपर्यंत मी गुन्हेगारांच्या विरोधात लढलो आहे. पण तुमची मानसिकताही बेछूट आरोप करायची आणि जनतेची दिशाभूल करायची, अशी आहे असे देखील निकम म्हणाले.

आरोपांकडे लक्ष द्यायचे नाही...

करकरेंचा मृत्यू हा अजमल कसाब यांच्या गोळीने झालेला नाही अस ते म्हणाले तर एका पोलिस निरीक्षकाच्या गोळीने झाला, असं म्हणाले होते. पण त्याला आधार काय होता ? त्यावेळी मी तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकलो असतो. पण मला अशा बेछूट आरोपांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही.

लोकांना माहीत आहे उज्वल निकम कोण

तुम्हाला जसं वाटतं की न्याय मिळणार नाही. पण लोकांना तसं वाटत नाही. तुमच्या पक्षाचे जेव्हा राज्य होते तेव्हा एका सिनेअभिनेत्याला वाचवण्यासाठी कोणी प्रयत्न केला, हे मी सांगू का ? आणि त्याला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्यावर काय दडपण आणलं होतं हे सांगू का? वेळप्रसंग आल्यावरती माझ्याकडे पुरावे आहेत. तुमहांला फक्त मी आता एक उदाहरण दाखवलं आहे.लोकांना माहीत आहे तुम्ही कोण आहात आणि उज्वल निकम कोण आहेत ते, या शब्दांत निकम यांनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT