Girish Mahajan Sarkarnama
मुंबई

Badlapur School Case : महिलेच्या आक्रोशापुढे 'संकटमोचक' महाजन हतबल; फाशी..फाशीच्या घोषणा, हातातून माईकही हिसकावला

Deepak Kulkarni

Badlapur Case News : बदलापुरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना बदलापूरमध्ये घडली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आंदोलकांनी शाळेसमोर तसेच बदलापूर रेल्वे स्थानकात तीव्र आंदोलन छेडले आहे.

गेल्या आठ तासांपासून येथे मोठ्या संख्येने नागरीक रस्त्यावर उतरले असून रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. पोलिसांनी समजावून सांगूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्यांच्याकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कुठलंही आंदोलन असो, मोर्चे असो ज्या ज्या वेळी सरकार अडचणीत सापडते तेव्हा भाजपचे संकटमोचक नेते अशी ख्याती असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे धावून येतात.त्यांच्या मध्यस्थीने आत्तापर्यंत अनेक आंदोलनं मागे घेण्यात यश आलेले दिसून येत आहे.

त्याचमुळे बदलापूरमधील जनआक्रोश पाहता सरकारकडून महाजन यांना घटनास्थळी धाडण्यात आले. गिरीश महाजन यांच्याकडून नागरिकांच्या मनधरणीचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.पण येथील महिलांसह संतप्त जमावाने संकटमोचकाला खडेबोल सुनावले.

आंदोलक म्हणाले, महाराष्ट्रात अशा घटना सातत्यानं घडत आहेत.आजही येथे महिला आणि मुली सुरक्षित नाही. सरकारने आत्तापर्यंत कडक कारवाई का केली नाही. पीडित मुलीच्या पालकांना पोलिस ठाण्यात 10 ते 12 तास ताटकळत का बसून ठेवण्यात आले.अशाप्रकारे संतप्त जमाव मंत्री महाजनांसमोरच आक्रमक झाल्याचे दिसून आले.तसेच घटना 13 ऑगस्टला घडली.13 तारखेपासून पोलिसांनी आत्तापर्यंत काय केलं?”, असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना केला.

मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जमावाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण जमावाने त्यांच्यासमोरही फाशी फाशीच्या घोषणा देणं सुरू ठेवले. महाजन म्हणाले, तुमचा राग रास्त आहे.पण सरकारचीही बाजू आपण समजून घ्यावी. या घटनेची एसआयटी चौकशी होईल. आम्ही कोणालाही सोडणार नाही. तुम्हांला जे अपेक्षित आहे, तेच होईल असे आश्वासनही भाजप(BJP) नेते गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिले.

महाजन म्हणाले, ही घटना अत्यंत गंभीर आहे, सरकारही या घटनेबाबत संवेदनशील आहे.या घटनेचं राजकारण करू नये असे आवाहनही महाजन यांनी यावेळी केले.अशाप्रकारे कोणताही मुद्दा सोडवला जाऊ शकत नाही.आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.माझी आपल्याला विनंती आहे , सकाळपासून आपण शांततेनं आंदोलन केले आहे.वारंवार विनंती करुनही आंदोलक मात्र फाशीच्या मागणीवर ठाम होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT