Raj Thackeray on Badlapur School Case : बदलापूर उद्रेकानंतर राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश; म्हणाले, कठोर शिक्षा होईपर्यंत...

Badlapur School Case : बदलापूर येथील दोन छोट्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, बदलापूर येथील उद्रेकानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Badlapur School Case : बदलापूर येथील (Badlapur School Crime) एका शाळेतील दोन छोट्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असून ही घटना समोर आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात पालकांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, बदलापूर येथील उद्रेकानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरे यांनी 'आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असं आवाहन मनसैनिकांना केलं आहे.'

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ?, असा संतप्त सवाल राज यांनी प्रशासनाला विचारला आहे.

'एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या... ' असं आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्यांना केले आहे.

बदलापुरातील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आले आहेत. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा आदेश, तर शाळा प्रशासनातील मुख्याध्यापकासह चार शिक्षकांचे निलंबन केले आहे"

तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी (SIT) ची स्थापना केली आहे. पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाची चौकशी (Badlapur rape case) करणार आहे. फडणवीस यांनी एक्सवर ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून आयोगाचे पथक दिल्लीवरून बदलापूरकडे रवाना झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com