Nawab Malik and Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Nawab Malik Bail News: जामीन मिळाला नवाब मलिकांना; पण फटाके फुटले अजितदादांच्या ऑफिसबाहेर

NCP News: नवाब मलिक तुरुंगाबाहेर येताच राष्ट्रवादीत पुन्हा राजकारण फिरण्याची चिन्हे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला. मात्र, मलिक तुरुंगाबाहेर येताच राष्ट्रवादीत पुन्हा राजकारण फिरण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

मलिकांना जामीन मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मंत्रालयासमोरील कार्यालयासमोर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. त्यामुळे जामीन नवाब मलिकांना मिळाला. मात्र, फटाके अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याने याचा अर्थ काय काढायचा, असा सवाल आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

नवाब मलिक हे शरद पवारांचे समर्थक समजले जातात. पण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आणि मलिक तुरुंगाबाहेर आल्यानंतर ते काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे नवाब मलिक आता अजितदादांच्या गटाला पाठिंबा देतात की, शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात, हे पाहाणेही तितकेच महत्वाचे असले तरी काही दिवसांपूर्वीच मलिकांच्या मुलीने अजितदादांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. त्यातच मलिकांना जामीन मिळताच राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मंत्रालयासमोरील कार्यालयासमोर फटाके फोडत जल्लोष करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहेत.

अजितदादांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रावादी असे चित्र राज्यभरात पाहायलाही मिळाले. त्यामुळे आता शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे मलिक हे शरद पवारांची साथ सोडणार का? किंवा फुटीर गटात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची पाठराखण करणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT