Nawab Malik Bail : मोठी बातमी ! नवाब मलिकांना जामीन मंजूर; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

Supreme Court Grants Bail To Former Maharashtra Minister Nawab Malik: सुप्रीम कोर्टाने मलिकांच्या तब्येतीचा विचार करून जामीन मंजूर केला
Nawab Malik Bail
Nawab Malik BailSarkarnama
Published on
Updated on

NCP leader Nawab Malik Interim Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांच्या तब्येतीचा विचार करून दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करत मलिकांना मोठा दिलासा दिला आहे.

प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळण्यासाठी मलिकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. यानंतर कोर्टाने मलिकांना जामीन मंजूर केला. नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून मनी लाँडरिंग प्रकरणी तुरुंगात आहेत.

Nawab Malik Bail
Amit Shah Lok Sabha Speech : राजद्रोह कायदा रद्द होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

मुंबईतील कुर्ला या ठिकाणी गोवावाला कंपाऊंडच्या जागेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मलिकांवर आहे. या प्रकरणी मलिकांना फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलिक आजाराने त्रस्त आहेत.

Nawab Malik Bail
Rahul Gandhi On Manipur: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना मोदी-शाहांनी पाठीशी घातले ; राहुल गांधी संतापले..

प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाला विनंती केली होती. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे ईडीने म्हणले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com