Balasaheb Thackeray Death Anniversary Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवतीर्थावर कडेकोट बंदोबस्त; ५० अधिकारी, ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात

Shivtirth at Dadar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ११ वा स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....

Sachin Fulpagare

Balasaheb Thackeray Smruti Din : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे आणि शिंदे गटात शिवतीर्थावर मोठा राडा झाला. या राड्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ओळख पटवण्यासाठी व्हिडिओ तपासले जाणार आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा शिवतीर्थावर तैनात करण्यात आला आहे.

शिवतीर्थावर घडलेल्या घटनेप्रकरणी कायदेशी चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. कालच्या घटनेनंतर आम्ही जास्त काळजी घेतली आहे. कायदा सुव्यस्था कुठेही बिघडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

परिसरामध्ये 50 पेक्षा जास्त अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, असे पोलिस उपायुक्त मनोज पाटील म्हणाले. एकूण ३०० पोलिसांसह राज्य राखीव दल आणि शीघ्र कृती दलाचे जवानही तैनात करण्यात आल्याचं उपायुक्त पाटील यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, कालच्या घटनेनंतर आज सकाळपासून शिवाजी पार्कात तणावपूर्ण शांतता आहे. कालच्या राड्यानंतर आज शिवाजी पार्कात म्हणजेच शिवतीर्थावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभरातून शिवसैनिक स्मृतिस्थळावर दर्शनासाठी येत असतात. आणि मोठी गर्दी होत असते. कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT