Ritu Tawde Mumbai Mayor sarkarnama
मुंबई

Ritu Tawade: "मुंबईच्या रस्त्यांवर बांगलादेशी, रोहिंग्यांचं अतिक्रमण, त्यांना..."; महापौरपदी निवड होताच रितू तावडेंचा गर्भित इशारा

BMC Mayor Ritu Tawade: मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार असून यापदासाठी रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Amit Ujagare

BMC Mayor Ritu Tawade: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीनं बहुमताचा आकडा पार केल्यानं भाजपला तब्बल २५ वर्षांची शिवसेनेला एकहाती सत्तेपासून दूर करत आपला महापौर बसवण्याची संधी मिळाली. त्यानुसार भाजपनं मराठी महापौर म्हणून रितू तावडे यांना यासाठी संधी दिली आहे. पण त्यांच्याविरोधात ठाकरेंच्याशिवसेनेसह इतर कुठल्याच पक्षानं उमेदवार दिला नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळं रितू तावडे यांचं महापौरपद निश्चित झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी मुंबईसाठी काय करणार हे देखील स्पष्ट केलं आहे.

बांगलादेशी, रोहिंग्यांना....

एका हिंदी न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलताना रितू तावडे म्हणाल्या, मला इथं प्रत्येक मुंबईकरासाठी काम करायचं आहे. जर मुंबईकरांची इच्छा आहे की त्यांना चालायला फुटपाथ नाही तर त्यांच्या मनात यावरुन रोष आहे. मुंबईकर हे टॅक्स पेअर आहे. मुंबईकर अलर्ट आहेत, शिक्षित आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना असं वाटतंय की, आम्हाला रस्त्यावरुन चालायचय पण आम्हाला रस्ताच उपलब्ध नाही. मग या रस्त्यांवर कोणी अतिक्रमणं केली आहेत, तर बांगलादेशी रोहिंग्या यांनी! त्यामुळं जर मुंबईला आपल्याला सेफ ठेवायचं असेल सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावं लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे.

मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला असल्याचं बोललं जातं तर आपण यावर काय काम करणार? या प्रश्नाला उत्तर देताना रितू तावडे म्हणाल्या, भ्रष्टाचारमुक्त संपूर्ण मुंबई महापालिका आणि यापूर्वी २५ वर्षात जे होत होतं, ती मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणं ही देखील आमची प्राथमिकता आहे, असंही बिनविरोध महापौर होणाऱ्या रितू तावडे यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत रितू तावडे?

दरम्यान, रितू तावडे या घाटकोपरच्या वॉर्ड क्रमांक १२७ मधून निवडून आल्या आहेत. त्यांचा वॉर्ड हा गुजराती बहुल भाग आहे. त्यामुळं रितू तावडे यांच्या निवडीद्वारे भाजपनं एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच त्यांनी मराठी महापौर दिला तो देखील बहुसंख्य गुजराती लोकांनी निवडून दिलेला. यामुळं मराठी आणि गुजराती हे दोन्ही समुदाय नाराज होणार नाहीत. रितू तावडे या सलग दुसऱ्यांना नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. रितू तावडे यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत शिक्षण समितीचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. गुंतागुंतीचे विषय आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अधिकाऱ्यांवर ठेवलेला वचक यामुळं त्या अभ्यासून नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.

महापालिकेत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी क्षमता त्यांच्यामध्ये आहे, ज्याची भाजपला गरज होती. कारण रितू तावडे या आक्रमक वक्त्या देखील आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपच्या त्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT