PMC: पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम! पाण्यात देव ठेवून बसलेल्यांची प्रतीक्षा वाढणार

PMC: आता ही निवड लांबणार असल्याचं निश्चित झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरच नवा स्थायी समिती अध्यक्ष मिळणार असल्याचे समोर आले आहे.
PMC Election 2026
PMC Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

PMC News: महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेत्यांच्या पदांची निवड झाल्यानंतर आता पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. यापदामुळं महापालिकेची तिजोरी थेट हातात येत असल्याने इच्छुक उमेदवारांची स्पर्धा तीव्र झाली आहे. यापूर्वी 9 तारखेला स्थायी समितीमधील सर्व सोळा सदस्यांची नावे निश्चित होणार होती आणि त्यानंतर 14 किंवा 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार होतं. मात्र, आता ही निवड लांबणार असल्याचं निश्चित झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरच नवा स्थायी समिती अध्यक्ष मिळणार असल्याचे समोर आले आहे.

PMC Election 2026
BMC Mayor: मुंबई महापौर निवडणुकीबाबत मोठी घडामोड! ठाकरे सेनेचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा; निवडणूक बिनविरोध होणार?

भाजपने मागील सभागृहाचे कामकाज सांभाळणारे गटनेते गणेश बिडकर यांनाच पुन्हा गटनेतेपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे सभागृह नेतेपदाची जबाबदारीही ते पार पाडणार हे निश्चित झाले आहे. परिणामी, गणेश बिडकर हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अनिल टिंगरे तसेच राजेंद्र शिळीमकर यांच्यात तीव्र चुरस सुरू असल्याची चर्चा आहे.

PMC Election 2026
Adani Vidarbha: अदानी समुहानं विदर्भात केली मोठी गुंतवणूक! फडणवीसांनी सांगितलं विकासाचं टार्गेट

धीरज घाटे हे सध्या भाजपचे शहराध्यक्ष असल्याने, पक्षाच्या 'एक व्यक्ती, एक पद' या धोरणानुसार त्यांना हे पद मिळेल की नाही याबाबत पक्षांतर्गत वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. जर घाटे यांना अध्यक्षपद दिले जाणार असेल, तर शहराध्यक्षपदासाठी बदल करावा लागेल अशीही बोलणी सुरू असल्याचं कळतंय.

PMC Election 2026
Yavatmal Crime News: धक्कादायक! यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाचं कुटुंबासह अपहरण, डोक्याला बंदूक लावली अन्...

मात्र, आता या सर्व चर्चा सुरू असताना 9 तारखेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे. त्यानंतर ही सर्वसाधारण सहभाग तहकूब करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे एका ओळींमध्ये महापौर आणि उपमहापौरांचा अभिनंदनचा प्रस्ताव ठेवतील आणि त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली सभा होणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या श्रद्धांजली सभा झाल्यानंतर स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करणे योग्य नसल्याने ती निवड पुढे ढकलण्यात आली असल्याचा सांगितलं जात आहे.

PMC Election 2026
Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले; भाजपचे लोक 100 मीटरच्या आत, हे काय लावलंय?

त्यामुळे 12 किंवा 14 तारखेला सर्वसाधारण सभा बोलून या सर्वसाधारण सभेमध्ये 16 नावं स्थायी समितीसाठी आणि इतर सर्व समित्यांसाठीच्या सदस्यांची नावांची घोषणा करण्यात येणार आहे. संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये भाजपचे 12 राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि काँग्रेसचा 1 असे टोटल 16 सदस्य असणार आहेत. त्यादिवशी या सर्व सदस्यांची नावे निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणून विभागीय आयुक्तांकडे या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी नेमण्याची विनंती महापालिकेला करावी लागणार आहे.

PMC Election 2026
Vilas Bhumre : शिवसेना आमदाराच्या मुलाचा हट्ट निवडणूक कर्मचाऱ्याच्या मुळावर; बोटाला लावलेली शाई अन् करू दिलेले मतदान अंगलट

हा पिठासिन अधिकारी नेमण्यासाठी 8 दिवसाचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारी अखेर उजाडणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आपल्याला स्थायी समिती अध्यक्षपद मिळावं म्हणून पाण्यात देव बसलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com