ZP Election_Kokan
ZP Election_Kokan

Kokan ZP Exit Polls : कोकणात महायुतीवरच जनतेचा विश्वास! एकनाथ शिंदेंच्या सेनेला पहिली पसंती; काय सांगताहेत एक्झिट पोल्स?

Kokan ZP Exit Polls : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडलं. यामध्ये कोकण विभागातील ५ पैकी ३ जिल्हा परिषदा आणि एकूण ४५ पैकी ३२ पंचायत समित्यांसाठी मतदान झालं.
Published on

Kokan ZP Exit Polls : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडलं. यामध्ये कोकण विभागातील ५ पैकी ३ जिल्हा परिषदा आणि एकूण ४५ पैकी ३२ पंचायत समित्यांसाठी मतदान झालं. कोकण विभागातील पालघर, ठाणे हे जिल्हे सोडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा यामध्ये समावेश आहे. या निवडणुकांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. त्यानुसार कोकण विभागात मतदारांनी महायुतीवरच विश्वास दाखवल्याचं यामधून दिसत असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा इथं प्रभाव कायम असल्याचंही या निकालाच्या अंदाजातून दिसत आहे.

ZP Election_Kokan
PMC: पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम! पाण्यात देव ठेवून बसलेल्यांची प्रतीक्षा वाढणार

साम टीव्ही न्यूजनं केलेल्या मतदानोत्तर चाचण्या अर्थात एक्झिट पोल्सनुसार,

रायगड - एकूण जागा - ५९

शिंदे सेना- २५

भाजपा - १७

राष्ट्रवादी (अप) -११,

काँग्रेस - २,

शेकाप - २

ठाकरे सेना - २

ZP Election_Kokan
BMC Mayor: मुंबई महापौर निवडणुकीबाबत मोठी घडामोड! ठाकरे सेनेचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा; निवडणूक बिनविरोध होणार?

रत्नागिरी - एकूण जागा - ५६

शिंदे सेना - ३०

ठाकरे सेना - १०

भाजप - ६

राष्ट्रवादी (अप) - ९

काँग्रेस - १

ZP Election_Kokan
Adani Vidarbha: अदानी समुहानं विदर्भात केली मोठी गुंतवणूक! फडणवीसांनी सांगितलं विकासाचं टार्गेट

सिंधुदुर्ग - एकूण जागा - ५०

भाजप - २१

शिंदे सेना - १३

ठाकरे सेना- ८

मनसे - ६

काँग्रेस - ०

राष्ट्रवादी (अप) - ०

पंचायत समित्या कोणत्या?

  1. रायगड - पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर

  2. रत्नागिरी - मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर

  3. सिंधुदुर्ग - वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com