Baramati airport development Sarkarnama
मुंबई

Baramati Airport news : बारामती विमानतळाबाबत CM फडणवीसांकडून मोठी घोषणा; अजितदादांच्या अपघातानंतर उचललं पाऊल...

Baramati airport development, Ajit Pawar plane crash : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष प्राधिकरण सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे.

Rajanand More

Devendra Fadnavis announcement : बारामती विमानतळावर लँडिंगवेळी अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारीला अपघात झाला होता. या अपघाताबाबतचा एएआयबीचा प्राथमिक अहवाल काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. त्यामध्ये बारामती विमानतळावरील असुविधांवर बोट ठेवण्यात आले होते. या अहवालावरून वाद निर्माण झाला असून अनेकांनी टीका केली आहे.

विमान अपघातावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा केली आहे. बारामती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

फडणवीस यांनी केवळ रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असली तरी अजितदादांच्या अपघाताच्या अनुषंगाने विमानतळावरील त्रुटीही दूर केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एएआयबीच्या अहवालामध्ये रनवेचे काम अनेक वर्षांपासून झालेले नाही, त्यावरील पांढरे पट्टे धुसर झाले आहेत, एटीसी यंत्रणा तात्पुरती आहे, रनवेला सुरक्षाभिंत नाही आदी मुद्दांवर एएआयबीने बोट ठेवले होते.

बारामतीप्रमाणेच राज्यातील लातूर आणि अमरावती येथील विमानतळाच्या ठिकाणीही रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ व कराड येथील विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष प्राधिकरण सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. गडचिरोली येथे ग्रीनफिल्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

भव्य स्मारक उभारणार

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरूवातीलाच अजितदादांना श्रध्दांजली म्हणून त्यांना साजेसे असे भव्य स्मारक उभारण्याची घोषणाही फडणवीसांनी केली. त्याचप्रमाणे अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सन्मान पुरस्कार दिला जाईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT