

Shiv Sena UBT politics : राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची बुधवारी घोषणा करण्यात आली. काँग्रेससह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही पवारांच्या नाव पुढे आल्यानंतर एक पाऊल मागे घेतले. पण या निर्णयामुळे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अद्याप या घोषणेवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इच्छूक खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल शरद पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेतील एकही नेता उपस्थित नव्हता. यावेळी संजय राऊत शरद पवारांना भेटल्याची माहिती खासदार सुळेंनी दिली होती. पण या घोषणेला अनेक तास उलटूनही आदित्य ठाकरेंनी मात्र त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
राज्यसभा उमेदवारीच्या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे शिवसेनेलाच संधी मिळावी, यासाठी आग्रही असल्याचे दिसत होते. त्यांनी उमेदवारीबाबत अद्याप अंतिम तोडगा निघाला नाही, असे सोशल मीडियाती दोनवेळा स्पष्ट केले होते. पण तोडगा निघाल्यानंतर त्यांनी एकही पोस्ट केलेली नाही. तर दुसरीकडे चतुर्वेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली, ती आपण सर्वोत्तम प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्या संपूर्ण कार्यकाळात खंबीरपणे पाठबळ दिले. माझा पक्ष माझ्यावर जी जबाबदारी टाकेल, त्यासाठी मी काम करत राहीन, असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची त्यांच्या जुन्या पोस्टवरून काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. ‘मी पुन्हा येणार जाणार’ अशी पोस्ट त्यांनी केली होती. त्याचा स्क्रीनशॉट टाकत नेटकऱ्यांनी चतुर्वेदी यांना डिवचले आहे. त्यावर त्यांनी तोडफोड करून परत नाही येणार, जिंकून येणार, असे सूचक विधान चतुर्वेदी यांनी केले आहे. तसेच एका ट्रोलरलाही त्यांनी ब्रेक के बाद पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.