Shivsena UBT News Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT Manifesto : बारसू रिफायनरी, कोळीवाडा क्लस्टर अन् जुनी पेन्शन योजना, ठाकरेंनी वचननाम्यात दिली 'ही' आश्वासन

Shivsena UBT Manifesto : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा वचननामा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आला. हा वचननामा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यापेक्षा वेगळा नाही. मात्र, शिवसेनेची जुनी पद्धत आहे. आम्ही युतीत होतो तेव्हा देखील आमचा वेगळा वचननामा प्रकाशित करायचो असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Jagdish Patil

Shivsena UBT Manifesto : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा वचननामा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आला. हा वचननामा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जाहीरनाम्यापेक्षा वेगळा नाही.

मात्र, शिवसेनेची (Shivsena) जुनी पद्धत आहे. आम्ही युतीत होतो तेव्हा देखील आमचा वेगळा वचननामा प्रकाशित करायचो असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

ते म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीचा जाहीरनाम्याशी सहमत आहोतच. पण शिवसेना म्हणून आमचं काही कर्तव्य आहे, वचननामा आहे. तो जनतेसमोर सादर करत आहोत. शिवसेनेची काही वचन आहेत आणि महत्वाचं म्हणजे खिशात मावतील अशी अशी पाच ते दहा वचने आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो आहे.

या वचननाम्यावर एक क्यूआर कोड देखील दिला आहे तो स्कॅन करून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता असं ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितलं. यावेळी त्यांनी कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करू असं आश्वासन दिलं. ते म्हणाले, सरकारची वक्रदृष्टी आता कोळी बांधवांच्या वाड्यावर पडली आहे. त्यांना एका टॉवरमध्ये ठेवायचं आणि उरलेली जमीन मित्राच्या घशात घालायची, असा सरकारचा डाव आहे. मात्र आम्ही कोळीवाड्यांचं अस्तित्व पूसू देणार नाही, असं आश्वासन त्यांनी कोळी बांधवाना दिलं.

तसंच यावेळी त्यांनी धारावी (Dharavi) प्रकल्प देखील रद्द करू असा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, हजारो एकर जमीन अदानीला दिली आहे. मात्र, आमचं सरकार आल्यावर त्यांनी काढलेले हे जीआर आम्ही ते फेकून देणार आहोत.

ठाकरेंच्या वचननाम्यातील महत्वाचे मुद्दे -

- कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करणार.

- मुंबईतून पळवलेलं वित्तिय केंद्र धारावीत नव्याने उभारणार.

- मुंलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणार.

- जुनी पेन्शन योजना लागू करणार.

- बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT