Raj Thackeray : मशि‍दीवरील भोंग्यांवर राज ठाकरे पुन्हा बरसले; म्हणाले, "मी तुम्हाला शब्द देतो…."

Maharashtra Assembly Election 2024 : "धर्मांध मुसलमानांच्या विरोधात आवाज उठवणारी मनसे आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज उठवला आणि ते बंद केले. हे केलं म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर सतरा हजार केसेस टाकल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं."
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Amravati News, 07 Nov : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे काढण्याचं वक्तव्य केलं आहे. 'माझ्या हाती सत्ता द्या, मी तुम्हाला शब्द देतो की एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही.' असं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती (Amravati) विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा मशि‍दीवरील भोंग्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

अमरावतीमधील सभेत बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, "धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात आवाज उठवणारी मनसे आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज उठवला आणि ते बंद केले. हे केलं म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर सतरा हजार केसेस टाकल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं.

माहीममध्ये एक अनधिकृत मझार होती ती आम्ही पाडायला लावली. मी आज तुम्हाला शब्द देतो, माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही." तसंच यावेळी त्यांनी मतदानासाठी मौलवी मशि‍दीतून फतवे काढतात. मात्र, हिंदू एकत्र कधी येणार? असा सवाल उपस्थित केला.

Raj Thackeray
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : 'सत्तेत नसतानाही मनसेनं 'रिझल्ट' दिला...'; राज ठाकरेंची तोफ धडाडली

ते म्हणाले, "आपण मराठी किंवा हिंदू म्हणून कधी विचार करणार आहोत? हिंदू फक्त दंगलीत एकत्र असतो इतर वेळी तो हिंदू नसतो आणि नेमंक हेच बाहेरच्यांना हवं आहे. मी एक क्लिप पाहिली त्यामध्ये मुसलमान मौलवी मशिदीतून फतवा काढतो आणि काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक गठ्ठा मतदान करण्याचं आवाहन करतो. लोकसभेला पण हेच घडलं, मग हिंदू का विखुरलेले आहेत?"

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेबांच्या नावाच्या मागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधी काढली असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली आणि त्यांना वाईट वाटेल म्हणून स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावामागील हिंदुहृदयसम्राट हे बिरूद काढलं.

Raj Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदेंचा ठाकरेंना मराठवाड्यात 'जोर का झटका'; 'या' वजनदार नेत्यानं निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडली

मात्र, ते लोक यांना उचलून आपटणार आहेत. माझे आजोबा सांगायचे एखाद्याला आपटायचं असेल तर त्याला आधी उचलावं लागतं. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेंव्हा मनसे, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढलं होतं. कितीवेळ बाहेर उभं राहून करायचं, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगलं सडकून काढायचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com