Mumbai BJP News : माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि करमाळा येथील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांचा अखेर भाजपामध्ये मंगळवारी प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या प्रदेश कार्यालायत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजप प्रवेश केल्यामुळे बसवराज पाटील यांच्या काँग्रेस सोडण्यामागे चव्हाण यांचाच हात असल्याचे बोलले जात आहे. खरंतर अशोक चव्हाण काँग्रेस सोडण्याअगोदर बसवराज पाटील हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती.
भाजपात प्रवेशाच्या पूर्वी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी विधान भवनातील दालनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सदिच्छा भेट घेतली. बसवराज पाटील मराठवाड्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. लिंगायत समाजातील एक प्रबळ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर रश्मी बागल यांच्या भाजपा प्रवेशाबाबत या अगोदरच मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी जाहीर केले होते. श्रीकांत भारती, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी रश्मी बागल यांना आमंत्रित केले असून, तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी बागल गट भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले होते.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्विजय बागल यांचे वडील दिवंगत दिगंबरराव बागल यांनी 1995 व 1999 असे दोन वेळा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले व ते राज्यमंत्री देखील होते. 2004 ला दिगंबरराव बागल यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पराभव केला. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2005 रोजी दिगंबरराव बागल यांचे निधन झाले.
यानंतर रश्मी बागल व दिग्विजय बागल यांच्या आई शामल बागल या 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार होत्या. त्यानंतर 2014 ला राष्ट्रवादी कडून करमाळा विधानसभा लढवत असताना रश्मी बागल यांचा पराभव झाला. त्यानंतर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी 2019 ला आरोग्य मंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.
(Edited by - Mayur Ratnaaprkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.