Tejasvi Surya Sarkarnama
मुंबई

Tejasvi Surya : दोन युवांची लढाई : आदित्य ठाकरेंवर उतारा म्हणून भाजपकडून 'तेजस्वी' मैदानात!

Tejasvi Surya : आदित्य यांच्या वरळी मतदारसंघात भाजपच्या युवा मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन सूर्या यांच्या हस्ते.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राजकारणात तरूणांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांचा कस लागत असतो. शिवसेनेतल्या बंडाळीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Adiyta Thackeray) यांच्या नेतृत्वाला नवी उभारी मिळाल्याचे दिसून येत होते. आता आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांना मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. आदित्य यांच्या वरळी मतदारसंघात भाजपच्या युवा मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन सूर्या यांच्या हस्ते होणार आहे.

भाजपच्या 'युवा' कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. भाजपने या कार्यक्रमाला 'मुंबई तेजस्वी स्वागत' असे नाव दिले आहे. दुपारनंतर सूर्या जिल्हा, विधानसभा क्षेत्र आणि प्रभाग स्तरावरील युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कसमोर हा कार्यक्रम होणार आहे.

सूर्या यांचे वय 31 वर्षांचे आहे. ते बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. विशेष म्हणजे ते भाजपचे सर्वात तरुण खासदार आहेत. 2020 मध्ये त्यांना युवा मोर्चाचे प्रमुख बनवण्यात आले. त्याच वेळी, 32 वर्षीय आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये वरळीतून राजकीय इनिंगला सुरुवात केली. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती होते. आदित्य आमदार असून, महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत.

भाजपची योजना :

काही काळापासून भाजप वरळी, दादर आणि लोअर परळ भागात राजकीय ताकद तयार करण्याच्या प्रयत्न करत आहे. यादरम्यान पक्षाचे विशेष लक्ष म्हणजे आदित्य यांच्या वरळी मतदारसंघावर आहे.

ऑगस्ट महिन्यात भाजपने जांबूरी मैदानावर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ऑक्टोबरमध्ये दादरच्या शिवाजी पार्कवर दिवाळी साजरी झाली. यासोबतच भाजपने नवरात्रीदरम्यान चिंचपोकळी येथे मराठी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले होते. यातून भाजपकडून राजकीय लाभ मिळवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT