Chandrashekar Bawnkule-Uddhav Thackeray News, Aurangabad Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Morcha: धारावीकरांसाठी मोर्चा काढणाऱ्या उद्धव ठाकरेंना बावनकुळेंनी सुनावले

Sachin Waghmare

Adani Dharavi Rehabilitation Project : 'धारावी बचाव, अदानी हटाव' अशा घोषणा देत धारावीच्या टी जंक्शनपासून अदानींच्या बीकेसी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने हा मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही, कोणत्याही पक्षात ती हिंमत नाही. केवळ जनतेला कन्फ्युज करण्यासाठी हा आरोप केला जात असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chnadrashekhar bawankule) यांनी स्पष्ट केले.

धारावीकरांचं जीवनमान उंचावणार आहे, अशावेळी उद्धव ठाकरे विरोध करतायत. धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्धव ठाकरेंना करता आला असता, परंतु त्यांना ते करता आला नाही... आता मात्र मोर्चा काढत आहेत. टीडीआर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ स्वतःची निष्क्रियता झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. धारावीतील टीडीआर घोटाळा हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झाला होता.

उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करतोय

राज्यातील महायुती सरकारकडून राज्यभरात मोठे विकास कामे केली जात आहेत. त्यामाध्यमातून राज्यात विकासाचे मॉडेल आणले जात आहे. मात्र, राज्याचा विकास होत असताना केवळ सूडबुद्धीतून सरकारच्या कामांवर विरोधकांकडून आरोप केला जात आहे. त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे यावेळी बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर विश्वास ठेवत नाही. जेव्हा स्वतःच्या निष्क्रियतेला सक्रियता दाखवावी लागते, तेव्हा असे प्रयत्न करावे लागतात. धारावीच्या विकासासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न असून जनताही धारावीच्या विकासाच्या बाजूने आहे. उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करू नये, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT