Anjali Damania, Dr Ashok Thorat Sarkarnama
मुंबई

Anjali Damania News : अंबाजोगाईतील ‘ते’ हॉटेल, कराड अन् बीड रुग्णालय..! दमानियांच्या निशाण्यावर आता अशोक थोरात

Beed District Hospital Ambajogai Hotel Dr Adhik Thorat Walmik Karad : अंबाजोगाई येथील एका हॉटेलचा  अंजली दमानियांनी उल्लेख केला आहे. हे हॉटेल अशोक थोरात यांचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Rajanand More

Mumbai News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. आता त्यांच्या निशाण्यावर बीड जिल्हा रुग्णालयाचे सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात आहेत. हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या रुग्णालयातील भरतीशी दमानियांनी थोरात कनेक्शन जोडले आहे.

दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत गंभीर दावे केले आहेत. अंबाजोगाई येथील एका हॉटेलचा त्यांनी उल्लेख केला आहे. हे हॉटेल थोरातांचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हॉटेल पियुष इन हे अंबाजोगाई येथील हॉटल कोणाचे आहे? मला अशी माहिती मिळतेय की, डॉ. अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत.

डॉ. अशोक थोरात यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे थोरातही चौकशीच्या फेऱ्यात येणार का, हा प्रश्न आहे. थोरात यांच्याच खाली संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन झाले. वाल्मिक कराडला दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मध्ये ठेवण्यात आले, असा दावा दमानियांनी केला आहे.

थोरातांची संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतरच्या घडामोडींशी थेट लिंक जोडत दमानियांनी खळबळ उडवून दिली आहे. थोरात हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीड मधे आगमन झाले आहे, असा दावा दमानियांनी केला आहे.

आता दमानिया यांच्या आरोपांनंतर थोरात यांच्याकडून त्याचा खुलासा केला जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. तसेच तपास यंत्रणांकडूनही दमानियांच्या आरोपांची दखल घेतली जाणार का, हेही लवकरच समोर येईल. दरम्यान, दमानिया आणखी कुणाचे पितळ उघडे पाडणार, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT