Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; जगमित्र कार्यालयाची चावी अजय मुंडेंच्या हाती, कराड सांभाळत होता काम

Walmik Karad latest update Ajay Munde Jagamitra office work : जगमित्र कार्यालयातून धनंजय मुंडे हे मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेत होते. हे काम वाल्मिक कराड पाहायचा.  
Ajay Munde, Dhananjay Munde
Ajay Munde, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Latest News : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांना याच प्रकरणामुळे पालकमंत्रिपदही मिळाले नाही, अशी चर्चा आहे. पण आता त्यांनी मतदारसंघात पुन्हा जोमाने कामाला सुरूवात करण्याचे ठरवले आहे.

धनंजय मुंडे यांच्या परळीतील जगमित्र कार्यालयाची सुत्रे त्यांनी चुलत बंधू अजय मुंडे यांच्याकडे सोपवली आहेत. याच कार्यालयातून परळी मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेणे, त्याची सोडवणूक करण्याचे काम आधी वाल्मिक कराड करायचा. आता कराड जेलमध्ये गेल्याने या खुर्चीवर कोण बसणार, याची चर्चा तालुक्यात रंगली होती.

Ajay Munde, Dhananjay Munde
Tanaji Sawant News : नाराज तानाजी सावंतांना पालकमंत्री सरनाईकांनी सुनावले खडे बोल; म्हणाले, 'राजकीय खुर्ची नेहमीच...'

अखेर धनंजय मुंडेंनी त्यांचेच चुलत बंधू अजय मुंडे यांच्या हाती कार्यालयाच्या चाव्या सोपवल्या आहेत. ते बीड जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेतेपदही त्यांच्याकडेच आहे. मंत्री मुंडे मतदारसंघात नसताना अजय मुंडे सक्रीय असायचे. आता ते जगमित्र कार्यालयात बसून ही कामे पाहतील.

दरम्यान, अजय मुंडे यांच्या हाती काम सोपवल्याने वाल्मिक कराडच्या समर्थकांमध्ये त्याची काय प्रतिक्रिया उमटते, हे पाहावे लागेल. वाल्मिक कराड हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीनासाठी वकिलांकडून प्रयत्न केले जात आहेत. कराडसह अन्य आरोपीही तुरुंगात आहेत. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनीही केली आहे.

Ajay Munde, Dhananjay Munde
Guardian Minister Dispute : दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

धनंजय मुंडे यांच्या हातून पालकमंत्रिपद निसटले असले तरी कॅबिनेट मंत्री हे पद शाबूत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सध्यातरी त्यांच्यावर भरवसा आहे. त्यामुळे आता मुंडेंनी पुन्हा परळी आणि बीडमध्ये आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी जोमाने काम सुरू केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com