Santosh Deshmukh 3 Sarkarnama
मुंबई

Santosh Deshmukh murder case : धारदार कत्तीसह हत्येसाठी वापरली 'ही' नऊ हत्यारं? क्रुरतेचा 'कळस'

Beed Santosh Deshmukh murder case police recovered different weapons wooden sticks and sharp edged weapons : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मारकऱ्यांकडून पोलिसांनी जप्त केलेली हत्यारांची सध्या चर्चा आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रुरतेने हत्या झाली. या हत्येच्या थरारानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. संतोष देशमुख यांच्या अंगावर 56 पेक्षा अधिक जखमा असल्याचे सांगितले जाते. या हत्याकांडात जवळपास मुख्य संशयितांना अटक करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.

सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलिस या हत्याकांडात सर्वच पातळीवर तपास करताना, संतोष देशमुख यांना कोणत्या हत्यारांनी मारहाण झाली, याची चर्चा होऊ लागली आहे. यात पोलिसांनी जप्त केलेली हत्याऱ्यांची चर्चा आहे.

संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी केज मांजरसुंबा रोडवरील टोलनाक्या जवळून अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर अपहरणाचा, हत्येचा गुन्हा (Crime) केज पोलिसात दाखल करण्यात आला. संतोष देशमुख यांची मारेकऱ्यांनी अतिशय क्रुरतेने हत्या केली. मारेकऱ्यांनी हत्येत वापरलेली शस्त्र पोलिसांनी जप्त केली असून, ती आता चर्चेत आली आहेत.

ही वापरली शस्त्र

41 इंच लांबीचा एक गॅसचा पाईप आणि त्यावर काळया करदोड्याने तयार केलेली मूठ, एक अर्धा इंच गोलाकार लोखंडी पाईप आणि त्यावर लोखंडी तारेचे क्लच वायर बसवलेले, लाकडी दांडा, तलवारीसारखे धारदार शस्त्र, चार लोखंडी रॉड आणि कोयता, लोखंडी फायटर, धारदार कत्ती, अशी हत्यारं पोलिसांनी (Police) जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाल्मिक कराड सरेंडर

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत. 10 डिसेंबरच्या पुरवणी जबाबात सात आरोपींची नावे घेण्यात आली. यात जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली. कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. त्याला पोलिसांनी 'वाँटेड' घोषित केले आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड त्यालाही अटक करण्यात आली आहे. तो 31 डिसेंबरला पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला होता.

आठ जणांना अटक

या हत्याकांडात मुख्य आरोपी सुदर्शन घुले असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. तसंच या सर्व मारेकऱ्यांचा 'आका' वाल्मिक कराड असून, तो देखील या हत्याकांडातील संशयित आहे. खंडणीतूनच हत्या झाल्याचे पोलिस तपास समोर येत आहे. संतोष देशमुख यांची टीप देणारा मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे याला देखील यात आरोपी करण्यात आले आहे. या हत्याकांडात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

यांची झाली चौकशी

आतापर्यंत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या पत्नीची मंजली कराड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, दोन अंगरक्षक, राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यासह आणखी चार ते पाच महिलांची 'सीआयडी'ने चौकशी केली आहे. तसेच केज 50 ते 60 व्यक्तींची चौकशी केल्याचे देखील माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT