Ajit Pawar And Dhananjay Munde : मोठ्या कालावधीनंतर भेटीला गेलेल्या धनंजय मुंडेंना अजितदादांनी विचारला थेट वाल्मिक कराडबाबतचा 'हा' रोखठोक सवाल (पाहा VIDEO)

Beed Santosh Deshmukh murder case NCP DCM Ajit Pawar Minister Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतल्यानंतर अजितदादांनी कोणते प्रश्न विचारले असतील, याची चर्चा आहे.
Ajit Pawar Dhananjay Munde
Ajit Pawar Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या झाली, हे हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.

यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि विरोधकांनी राज्यपालांची भेट घेताच, दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोघा नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे या दोघा नेत्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली, यावर तर्कविर्तक लढवले जात आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. बंद केबिनमध्ये झालेल्या या दोघा नेत्यांच्या चर्चेवरून अनेक तर्कविर्तक लढवले जात आहेत. यातच अजितदादांनी बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून मंत्री मुंडेंना बरचं काही विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ajit Pawar Dhananjay Munde
Sangram Kote Patil : अजितदादांचा शिर्डीतील शिलेदार मैदानात; आमदार धस यांना सुनावत सांगितला इतिहास

यात काही महत्त्वाचे प्रश्न विचारल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 'या प्रकरणात काही संबंध आहे का?', असा पहिला प्रश्न अजितदादांनी विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात अजित पवार खूप गंभीर आहेत, असे समोर येत आहे. याशिवाय अजितदादांनी या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय संशयित आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याचे नाव घेऊन प्रश्न विचारल्याचे देखील सूत्रांची माहिती आहे.

Ajit Pawar Dhananjay Munde
Bachchu Kadu : भाजपविषयी खरं मत ऐकायचंय, तर शिंदे अन् अजितदादांची 'नार्को टेस्ट' करा; बच्चू कडूंनी महायुतीला डिवचलं

या घटनेतील संशियत असलेला 'कराड याने घटनेची माहिती दिली होती का?' हा गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न अजितदादांनी धनंजय मुंडे यांना विचारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अजितदादांनी मंत्री मुंडेंना थेट कराडचे नाव घेऊन प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न विचारण्यामागे विरोधकांकडून होत असलेल्या अडचणींचा अजितदादांना किती सामना करावा लागत असेल, याची चर्चा सध्या सुरू आहे. याशिवाय या प्रश्न विचारण्यामागे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या, तर नाहीत ना? अशी देखील चर्चा होत आहे.

दरम्यान, आज सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीचं निवेदन यावेळी देण्यात आले. तत्पूर्वी शरद पवार यांनी हत्याकांडाचा मुद्दा लावून धरलेल्या लोकप्रतिनिधींच्या पोलिस संरक्षणात वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा मुद्दा भविष्यात आणखी तापणार असल्याचे चित्र आहे.

राज्यपालांनी देखील आपण या प्रकरणात लक्ष घालू, असं आश्वासन दिलं असून, आम्ही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहोत, अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. यामुळे या प्रकरणात आणखी काही खुलासे होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com