Bharat Gogawale on ST Bus Accident Case : मुंबईमधील कुर्ला येथील बेस्ट बस दुर्घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळही खडबडून जागे झाले आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज तात़डीची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यभरात एसटी बसेसची वाढते अपघात, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, बसेसची दुरावस्था आदी विविध मुद्य्यावर चर्चा झाली.
या बैठकीनंतर महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले(Bharat Gogawale) यांनी सांगितले की, जे अपघात झाले आहेत त्यानुषंगाने आजची बैठक होती. हे अपघात टाळण्यासाठी काय करता येईल यावर आम्ही चर्चा केली. अपघात टळावेत अपघातात लोक मृत्युमुखी पडू नयेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ड्राइव्हरचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. ड्रायव्हर नशापाणी करू नयेत यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
याशिवाय 'बसमध्ये तांत्रिक बिघाड असेल तर तातडीने त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे, त्यानुषंगाने आज चर्चा झालेली आहे. जुन्या बसेस बदलल्या पाहिजे यावर आमची पूर्ण सहमती आहे. ५० प्रवासी बसण्याची क्षमता असताना कधी कधी ७० प्रवासी घेऊन जावे लागतात. ड्राइव्हर गाडी चालवताना फोन उचलणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा सूचनाही देत आहोत, असं गोगावलेंनी सांगितलं आहे..
तर मराठवाड्यातील परभणीत सध्या हिंसाचार उफाळला असून खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरी एसटी बंद ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच 'शिवनेरी सुंदरी' बद्दल बोलताना गोगावले म्हणाले आम्ही तसा प्रस्ताव ठेवून मान्यता घेतलेली आहे. तशा गाड्या आल्यानंतर ती सुविधा कार्यान्वित करण्यासंर्भात निर्णय घेतला जाईल.'
याचबरोबर नागपूर(Nagpur) अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, तसा प्रयत्न सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा यासाठीच बैठका होत असतात. वरिष्ठ नेते चर्चा करत आहेत त्यावर निर्णय घेण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या गाडीत मी बसेन की नाही हे लवकरच कळेल. एकनाथ शिंदे लवकरच तसा निर्णय घेतील. असंही गोगावले यांनी यावेळी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.