bhaskar jadhav -ramdas kadam Sarkarnama
मुंबई

Bhaskar Jadhav : ‘छमछमदास, बामदास, भडवेगिरी करणारा, श्वान....’ भास्कर जाधवांकडून रामदास कदमांवर हल्लाबोल

Ramdas Kadam Statement : रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यानंतर भास्कर जाधव यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. या शब्दयुद्धामुळे महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच गहजब उडाला आहे.

Vijaykumar Dudhale
  1. रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले.

  2. भास्कर जाधव यांनी पलटवार करत कदमांवर वैयक्तिक टीका केली आणि त्यांना “कृतघ्न” व “भडवेगिरी करणारा” म्हणाले.

  3. दोन्ही नेत्यांच्या आरोप–प्रत्यारोपामुळे शिवसेना शिंदे गट व उद्धव गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

Mumbai, 03 October : माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. आमदार भास्कर जाधव यांनीही त्याच आणि सडेतोड शब्दांत कदमांवर पलटवार केला आहे.

आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, ‘रामदास कदमला मी छमछमदास, बामदास म्हणतो. रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सावली बारमध्ये भडवेगिरी करून त्यांनी पैसे कमावले आहेत, तो बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. रामदास कदमासारखा मूर्ख माणूस संपूर्ण महाराष्ट्रात नाही.

उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काय केले, असं रामदास कदम (Ramdas Kadam) विचारतो. अरे रामदास कदम २००९ मध्ये तू माझ्याविरोधात पराभूत झाला होता, त्यानंतर तुला मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांमधून विधान परिषदेचा आमदार केला. तू दोन वेळा मुंबईच्या नगरसेवकांमधून आमदार झालास, पण तू मुंबईसाठी काय केले, हे अगोदर सांगावे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, एकीकडे आम्ही शिवसेनाप्रमुखांचे भक्त म्हणायचे आणि त्याच शिवसेनाप्रमुखांवर अश्लाघ्य शब्दांत टीका करायची, अशा प्रकारचे हे बामदास कदम, छमछमदास, भडवेगिरी करणाऱ्यांकडून अशा प्रकारचे उद्‌गार अपेक्षित असतात.

ज्या शिवसेनेने रामदास कदमला 32 वर्षे लोकप्रतिनिधी केले, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणार नाही, कारण हा कृतघ्न माणूस आहे. शिंदेसेनेला आज तीन वर्षे झाली. पण, या काळात रामदास कदमला महाराष्ट्रातून भाषण द्यायला कोणी बोलावले आहे का? त्यामुळे अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदम याच्यासारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही, अशी जहरी टीका भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर केली.

काय म्हणाले होते रामदास कदम?

कोण भास्कर जाधव बिधव हो. मी आणलं त्याला पक्षामध्ये. त्याची कुवत, ऐपत आणि औकात काय? ही भुंकणारी कुत्री आहेत, त्यांना विचारतो कोण? त्याला विचारा तुला शिवसेनेत आणला कोणी. त्याला तिकिट कोणी द्यायला लावलं हे विचारा त्या भास्करला. हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांकडे गेला. पवारांकडून हा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे आलेला आहे. हा तर गद्दारीचा बाप आहे. हे काय माझ्यावर बोलणार हो? त्याची औकात काय? हे गद्दार काय माझ्याविरोधात बोलू शकतात, असा सवाल रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना विचारला होता.

प्रश्न 1 : रामदास कदम यांनी कोणावर आरोप केले?
उद्धव ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर.

प्रश्न 2 : भास्कर जाधव यांनी रामदास कदमांना काय म्हटले?
“छमछमदास, बामदास, भडवेगिरी करणारा आणि कृतघ्न.”

प्रश्न 3 : कदमांनी भास्कर जाधवांबाबत काय म्हटले होते?
“भास्कर गद्दार आहे, औकात नाही, शरद पवारांकडे जाऊन परत आला.”

प्रश्न 4 : या वादातून काय दिसून येते?
शिवसेनेतील शिंदे गट व उद्धव गटातील तणाव अजून वाढलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT