Bhaskar Jadhav : भास्कर जाधव पुन्हा नाराज, शाखाप्रमुखांवर थेट संताप व्यक्त करत म्हणाले, 'राखणदारच जागरूक नाही'

Bhaskar Jadhav Shivsena UBT Politics : आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर तळ कोकणात मोर्चे बांधणीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आप आपल्या पद्धतीने पक्ष बांधणी करताना दिसत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील पक्ष फुटीची मरगळ झटकण्याकडे पाऊल टाकले आहे.
MLA Bhaskar Jadhav
MLA Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. शिवसेना उद्धव गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत.

  2. त्यांनी चिपळूण शिबिरात शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.

  3. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोकणासह राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Chiplun News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील एकमेव नेते आमदार आमदार भास्कर जाधव आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर अॅक्टीव्ह मोडवर आले आहेत. त्यांनी आधी आपली नाराजी व्यक्त केल्याने राज्यभर याची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याने कोकणासह राज्यातील राजकीय वर्तुळात भूवया उंचावल्या आहेत. पण यावेळी त्यांची नाराजी ही शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत आहे. त्यांनी आपली नाराजी चिपळूण विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात व्यक्त केली आहे.

चिपळूण येथे पक्षाच्या शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांचे मार्गदर्शन शिबिरा झाले. यावेळी जाधव यांनी शाखाप्रमुखांच्या उपस्थितीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले, पक्षाचा रखवालदार हा त्या गावाचा शाखाप्रमुख असतो. गावचा शाखाप्रमुख जागरूक असेल तर गावात काहीही चुकीचे होत नाही. पण आपचा रखवालदारच जागरूक नाही. त्यामुळे पक्षाचे रक्षण कोण करेल?

MLA Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : मनसे-शिवसेना एकत्र! भाजप हादरली? ठाकरे ब्रँडवरून टीका करणाऱ्या प्रसाद लाडांवर भास्कर जाधवांचाही पलटवार

ज्या गावात शाखाप्रमुख सतर्क, जागरूक, अभ्यासू, निर्भय आणि निर्भीड आहे. त्या गावांमध्ये सहजासहजी कोणालाही शिरकाव करता येत नाही. त्यामुळे याची उजळणी घेण्यासाठी आधी माझ्याच मतदारसंघात तडताळणी केली. त्यासाठी सर्व शाखाप्रमुखांना महत्त्वाच्या बैठकीला येण्याचे निमंत्रण धाडले. पण सध्याच्या उपस्थितीवरून माझ्या स्वतःच्या मतदारसंघात वस्तुस्थिती चिंताजनक असल्याचे आता समोर येत आहे.

मी आमंत्रण धाडल्यानंतर उपस्थित असणारे शाखाप्रमुख पाहिले तर आता कोकणाची काळजी वाटू लागली आहे. माझ्याकडे पूर्व विदर्भ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, रामटेक या भागाची जबाबदारी असताना बैठका घेतल्या. त्याच पॅटर्नने येथे बैठक घेतली तर शाखाप्रमुख उपस्थितच राहत नाहीत, अशी स्थिती समोर आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

पक्षाने बैठक बोलावल्यास विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, संघटक, समन्वयकासह प्रमुख नेतेही हजर होतात. पण शाखाप्रमुख दांडी मारताना दिसत आहे. गावाचा आमचा रखवालदारच जागेवर नाही. तो जागरूक नाही, हेच समोर येत आहे. त्यामुळे रखवालदारच जागरूक नसेल तर माझ्या मतदारसंघात माझ्या पक्षाचे रक्षण कोण करेल? माझ्या पक्षाच्या सीमा तोडून आतमध्ये जो कोणी घुसायचा प्रयत्न करतो, त्याला कोण रोखेल? असा सवाल उपस्थित केला आहे.

तसेच जागरूक शाखाप्रमुखाने अलर्ट आणि डोळ्यात तेल घालून पक्षासाठी संघटनेकरता जागता पाहारा दिल्यास माझी खात्री आहे की पुन्हा एकदा शिवसेनेचे पूर्व वैभव प्राप्त करता येईल. शिवसेना पुन्हा उभी करता येईल. याआधी स्थानिकच्या निवडणुकी होतील की नाही याची शाश्वती नव्हती. पण आता सर्वोच्च निकाल आला आहे. पण यादरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीत काय झालं? मतदान कुठं गेले हे समोर येत आहे. मी कोकणात एकटाच निवडून आलो, पण माझे मताधिक्य काही हजारात आल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

MLA Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Vs Brahman : ब्राह्मण समाज भास्कर जाधव यांच्या 'डोक्यात' का गेला? पडद्यामागे नेमकं काय सुरु आहे?

FAQs :

प्रश्न 1: भास्कर जाधवांनी नाराजी का व्यक्त केली?
उत्तर: त्यांनी शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.

प्रश्न 2: भास्कर जाधव कोठे बोलले?
उत्तर: त्यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातील पक्ष शिबिरात आपली नाराजी व्यक्त केली.

प्रश्न 3: याचा राजकारणावर काय परिणाम झाला?
उत्तर: कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com