Police cordon off the crime scene in Bhiwandi where BJP Youth Wing leader Praful Tangde and his associate were murdered, sparking tension in the area. Sarkarnama
मुंबई

Bhiwandi Murder Case : भिंवडीत रक्तरंजित थरार! भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह सहकाऱ्याची निघृण हत्या

Murder of BJP Youth Leader in Bhiwandi : भिवंडी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोमवारी (ता.11) रात्री दोन जणांची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्यांमधील एक व्यक्ती हा भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आहे.

Jagdish Patil

Bhiwandi BJP Leader Murder : भिवंडी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोमवारी (ता.11) रात्री दोन जणांची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्यांमधील एक व्यक्ती हा भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आहे.

या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून मोठा तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी हे भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथील आपल्या जेडीटी इंटरप्रायसेस या आपल्या कार्यालयात बसले होते.

याचवेळी रात्री जवळपास 11 च्या सुमारास काही अज्ञातांनी ऑफिसमध्ये येऊन या दोघांवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडींसह त्यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, मागील वर्षीही प्रफुल्ल तांगडी यांच्यावर अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी ते सुदैवाने थोडक्यात बचावले होते. मात्र, काल रात्री झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हा हल्ला चार ते पाच जणांनी केल्याचं सांगितलं जात असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरूवात केली. मात्र या घटनेतील मारेकरी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पण ही हत्या नेमकी का आणि कोणी केली याबाबतची माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT