Bhiwandi Mayor Narayan Chaudhary  sarkanama
मुंबई

Bhiwandi Mayor : भाजपला मोठा धक्का! भिवंडीच्या महापौरपदी काँग्रेस आघाडी समर्थक नारायण चौधरी; 6 मतं फुटली!

Bhiwandi Mayor Narayan Chaudhary Congress : भिवंडीमध्ये महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला. काँग्रेसने नारायण चौधरी यांच्यासाठी व्हिप जारी केला होता तर भाजपने स्नेहा पाटील यांच्यासाठी व्हिप जारी केला होता.

Roshan More

Bhiwandi News : चंद्रपूरमध्ये हाताशी आलेले महापौर पद भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतले होते. त्याचा बदला काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतला आहे. भाजपचे नऊ नगरसेवक फोडून काँग्रेस सेक्युलर फ्रंटचा महापौर भिवंडीमध्ये झाला आहे.

भिवंडी महापौर निवडणुकीत नारायण चौधरी विजय होत महापौर झाले. भाजपच्या नगरसेवकांमध्ये पडलेली फुटीमुळे काँग्रेसचे पारडे जड मानले जात होते. भाजपने नारायण चौधरी यांना डावलून स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे चौधरी यांनी थेट बंडखोरी करत काँग्रेसशी हातमिळवणी केली.

चौधरी यांच्यासह भाजपचे नऊ नगरसेवक फूटले होते. ते काँग्रेसची आघाडी असलेल्या सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर काँग्रेसने चौधरी यांना महापौर पदाचे उमेदवार घोषित करून तसा व्हिप देखील जारी केला आहे.

भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक विजयी झाले आहेत. दरम्यान, भाजपचे नऊ नगरसेवक फूटले ते काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले आहेत.

नारायण चौधरी म्हात्रेंसोबत आले

महापौर निवडीच्या आधी खासदार बाळ्यामामा म्हात्रे हे भाजपच्या नारायण चौधरींना हाताला धरून महापालिकेमध्ये आले. त्यांनी सांगितले की, महापौर हा सेक्युलर फ्रंटचाच होणार. नारायण चौधरी हे नऊ नगरसेवकांना घेऊन आले आहेत.

अपात्रतेची टांगती तलवार?

नारायण चौधरींनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसच्या आघाडीत सहभागी झाले. त्यांच्यासोबत नऊ नगरसेवक देखील आहेत. मात्र, भाजपची सदस्य संख्या 22 असल्याने फुटलेल्या नगरसेवकांची संख्या 14 असायला हवी होती, अशी चर्चा आहे. त्यामुळे पक्षांतर कायद्याअंतर्गत भाजप चौधरी यांच्यावर कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे चौधरींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

भाजपची सहा मतं फुटली

भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मतं पडली. त्यांची सहा मतं फुटली आहेत. भाजपकडे सभागृहात 22 नगरसेवक निवडणूक आले आहेत. मात्र, नारायण चौधरी यांनी बंडखोरी करत काँग्रेसच्या आघाडीत गेल्याने भाजपला फटका बसला. तर, शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांना मतदान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT