Devendra Fadnavis & Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Stay On State Govt Transfer Orders: शिंदे फडणवीस सरकारला 'मॅट'चा मोठा झटका; महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

सरकारनामा ब्युुरो

Mumbai : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने अनेक महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बदली झालेल्यांपैकी काही तहसीलदारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयात धाव घेत या सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिलं होतं. ठाणे, पुणे आणि सांगली या विभागातील या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. यावर मॅटनं शिंदे फडणवीस सरकारला मोठा झटका दिला आहे.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला मॅट कोर्टाने मोठा दणका दिला आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचं निरीक्षण नोंदवत मुंबई मॅट कोर्टाने राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हा शिंदे फडणवीस सरकार(Shinde Fadnavis Government )ला मोठा धक्का मानला जात आहे.

मॅटच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा 54 पाने आदेश प्रथमदर्शनी बेकायदा असल्याचं निरीक्षण नोंदवत राज्य सरकारचा आदेश रद्दपातल करत अधिकाऱ्यांना पूर्वीच्या जागी रुजू होण्याचे निर्देश दिले आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या राज्यातील अनेक महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

या बदल्यांविरोधात काही तहसीलदार(Tehsildar) पदावरील अधिकाऱ्यांनी मुंबईतील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालया(मॅट) त धाव घेतली होती. ठाणे, पुणे आणि सांगली या विभागातील या अधिकाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. यावर मॅटनं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या आदेशांमध्ये मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.

'मॅट'नं निकालात काय म्हटलंय..?

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने आपल्या निकालात म्हटले आहे की बदल्यां(Transfer)चा आदेश जारी करताना कायदा धाब्यावर बसवला गेला. कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच बदल्यांच्या प्रस्तावावर महसूल मंत्र्यांनी सह्या केल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. काही मुदतपूर्व बदल्या करताना कुठलेही कारण देण्यात आले नाही किंबहुना नागरी सेवा मंडळाची मान्यता न घेता काढलेले बदल्यांचे आदेश पूर्णपणे बेकायदा आहेत अशा शब्दांत ताशेरे ओढत मॅटने बेकायदेशीर बदल्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT