Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात उभी फूट पडली होती. अजित पवारांनी पक्षात बंडाचं निशाण फडकवलं. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ या पवारांच्या विश्वासू शिलेदारांसह आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. नऊ मंत्र्यांनी राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथही घेतली. तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षासह घड्याळ चिन्हावर दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीतील वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आप आपल्या भूमिका मांडण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
शिवसेनेपाठोपाठ केंद्रीय निवडणूक अजित पवार(Ajit Pawar ) यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपणच असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता. अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला नोटीस पाठवली होती.
राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत असून राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह आम्हाला देण्यात यावे, अशी याचिका अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. या बंडानंतर शरद पवार(Sharad Pawar) गटानेही तातडीने हालचाली करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आता त्यावर आपआपली भूमिका १८ ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाने मुंदत दिली आहे.
अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारला पाठिंबा दिला व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवारांसहित राष्ट्रवादीच्या एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी ४० आमदारांच्या सही असलेलं पत्र निवडणूक आयोगाला दिलं.
शरद पवार गट उद्या आयोगाला उत्तर सादर करणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) चा शरद पवार गट गुरूवारी निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या गटाने कोणती कागदपत्र दिली आहेत, त्यांची यादी द्या म्हणजे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल असा मेल शरद पवार गटाने केला होता. पण त्याला निवडणूक आयोगाकडून कुठलंही उत्तर आलेलं नाही. आता शरद पवार गटाने पुन्हा 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे, पण त्यावरही निवडणूक आयोगाच उत्तर आलेलं नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील, असे सांगत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह आमचे आहे, असा दावा अजित पवार गटातर्फे त्यांचे नेते प्रफुल पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केला आहे. या पत्राबाबत आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यावर शरद पवार यांनी उत्तर पाठवले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून, त्यात दोन गट नाहीत. आयोगाने त्या पत्राची दखल घेण्याची गरज नव्हती. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर दावा करणे अकाली आणि खेदजनक आहे. अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेली मागणी फेटाळावी असे त्यांनी उत्तरात म्हटल्याचीही माहिती समोर आली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.