Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील मंडणगड येथे दिवाणी न्यायालयाला मंजुरी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हा तालुका रायगड लोकसभा मतदारसंघात येतो आणि विधानसभेला तो दापोलीला जोडण्यात आलेला आहे. एकंदरीतच मुख्यमंत्री शिंदे यांनी योगेश कदम यांच्याबरोबर खासदार सुनील तटकरे यांनाही खूश करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. (Big gift to Yogesh Kadam, Sunil Tatkare from Chief Minister)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मंडणगडला दिवाणी न्यायालय मंजूर करण्यात आलेले आहे. यासोबतच येत्या गौरी गणपतीला राज्यातील जनतेला पुन्हा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा त्यात समावेश असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हा तालुका विधानसभेला दापोली मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे, तर लोकसभेला तो रायगड मतदारसंघात आहे. दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश कदम आमदार आहेत, तर रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे करतात. त्यामुळे युती सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या योगेश कदम यांच्या मदारसंघासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळाच्या आज (ता. १८ ऑगस्ट) झालेल्या बैठकीतील निर्णय
१) राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना राबविणार. सुमारे पाच हजार कोटींचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
२) गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलो रवा, चनाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा असणार (अन्न व नागरी पुरवठा)
३) आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार (कौशल्य विकास )
४) मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी (महसूल विभाग)
५) महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
६) केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)
७) सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे (सहकार विभाग )
८) दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन मिळणार (विधी व न्याय विभाग)
९) मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.