Baramati Lok Sabha Review Meeting : उद्धव ठाकरेंचेही ‘मिशन बारामती’; मतदारसंघ भाजपकडे जाऊ न देण्यासाठी विशेष रणनीती

Shivsena News : जखमी उद्धव ठाकरे आता भाजपचे डावपेच हाणून पाडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादीतील ताज्या घडामोडी पाहता हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात सहजासहजी जाऊ द्यायचा नाही, अशी व्यूहरचना शिवसेनेकडून आखली जात आहे. त्याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष असणार आहे. (Now Uddhav Thackeray's 'Mission Baramati' too)

भारतीय जनता पक्षाने विशेषतः तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १३ महिन्यांपूर्वी शिवसेनेचा अभेद्य किल्ल्याला भगदाड पाडून बिनीचे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना फोडले. त्या धक्क्यातून उध्दव ठाकरे अजूनही सावरलेले नाहीत. त्यातच महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला राष्ट्रवादीही फुटला आहे. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे.

Uddhav Thackeray
Solapur Loksabha Election : शरद पवारांनी मला सोलापूर लोकसभेची तयारी करायला सांगितले आहे; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट

जखमी उद्धव ठाकरे आता भाजपचे डावपेच हाणून पाडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवसेनेकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा आज आढावा घेतला जाणार आहे. बारामतीबरोबरच शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघातही चाचपणी केली जाणार आहे.

Uddhav Thackeray
Sharad Pawar Sabha : आता वेळ आलीय.... चुकीच्या लोकांना आवरायची; शरद पवारांचा निशाणा कोणावर?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यामधील गाठीभेटी पाहून शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली की काय, असा प्रश्नही चर्चिला जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला सहजासहजी जाऊ द्यायचा नाही, अशी रणनीती शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आखली जात आहे.

Uddhav Thackeray
Sharad Pawar Ambegaon Meeting: भुजबळ, मुंडेंनंतर आता वळसे पाटलांचा नंबर; आंबेगावात लवकरच सभा घेण्याचा पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द

पवार काका-पुतण्यांमधील गाठीभेटीवर सर्वसामान्य जनतेप्रमाणेच उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया असू शकते. भविष्यात शरद पवार यांनीही भाजपला अनुकूल भूमिका (तशी भूमिका ते घेणार नाहीत, असे बीडमधून शरद पवारांनी जाहीर केले) घेतली तर बारामती भाजपच्या पथ्यावर पडणार नाही, यासाठी ठाकरे गटाकडून विशेष रणनीती आखली जात आहे. त्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीत कानमंत्र मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com