Manisha Kayande Join Shivsena Sarkarnama
मुंबई

Manisha Kayande Join Shivsena: मोठी बातमी! मनिषा कायंदेंचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना धक्का!

सरकारनामा ब्यूरो

Political News: ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे या शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आज सकाळपासून सुरू होत्या. अखेर मनिषा कायंदे यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनिषा कायंदे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

तर दुसरीकडे मनिषा कायंदे या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटाने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली होती. पक्षाच्या विरोधी कारवाया केल्याचा ठपका मनिषा कायंदे यांच्यावर ठेवत त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर आता आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

दरम्यान, सकाळपासून त्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व घाडामोडींवर मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आता यापुढे शिवसेनेत काम करत राहणार असल्याचंही मनिषा कायंदे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितलं.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT