Manisha Kayande: मनिषा कायंदेंच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर ठाकरे गट सावध; केली मोठी कारवाई

Thackeray Group Shivsena On Manisha Kayande: ठाकरे गटाची मनिषा कायंदे यांच्यावर मोठी कारवाई केली.
MLA Manisha Kayande and 
Uddhav Thackeray
MLA Manisha Kayande and Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे या शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आज सकाळपासून सुरू आहेत. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मात्र, आता मनिषा कायंदे यांच्यावर ठाकरे गटाने मोठी कारवाई केली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षाच्या प्रवक्तेपदावरून मनिषा कायंदे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तसेच याबाबतचे पत्रही जारी करण्यात आले आहे.

MLA Manisha Kayande and 
Uddhav Thackeray
Shinde Group Entry in Legislative Council : मनीषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिंदे गटाची होणार विधान परिषदेत एन्ट्री

आमदार मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आमदार मनिषा कायंदे या सकाळपासून नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घाडामोडींवर मात्र, मनिषा कायंदे यांनी अद्याप यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

आमदार मनिषा कायंदे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

Thackeray Group Shivsena On Manisha Kayande
Thackeray Group Shivsena On Manisha KayandeSarkarnama

दरम्यान, आमदार मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई केल्याच्या माहितीचे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयाने जारी केले आहे. मनिषा कायंदे या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने ठाकरे गटाने सावध पवित्रा घेत ही कारवाई केली आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com