Uddhav Thackeray, Narayan Rane Narayan Rane
मुंबई

Narayan Rane News: मोठी बातमी: नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, जुनं प्रकरण पुन्हा तापलं; ठाकरेंच्या नेत्यानं कोर्टाला थेट पुरावेच दिले

Uddhav Thackeray Shivsena Vs Narayan Rane: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मानहानीकारक दावा दाखल करण्याबाबत आपली भूमिका न्यायालयासमोर स्पष्ट करतानाच नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर जे आरोप केले, ते अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं.

Deepak Kulkarni

Mumbai News: सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे हे भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ते टीका करताना कोणताही मागचा पुढचा विचार करत नाहीत. त्यांच्यावर सर्वाधिक रडारवर उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेनाच राहिल्याचंही वारंवार पाहायला मिळालं आहे. अशातच आता राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते समजले जाणाऱ्या खासदार संजय राऊतांनी राणेंविरोधात आक्रमक पाऊल उचलताना मानहानीकारक दावा दाखल केला आहे.

माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे(Narayan Rane) यांना आता संजय राऊतांच्या खासदरकीबाबत केलेलं विधान भोवण्याची शक्यता आहे. भांडुप येथील कोकण महोत्सवात नारायण राणे यांनी जानेवारी 2023 रोजी राऊत यांच्या खासदारकीबाबत केलेलं विधान केलेल्या विधाना विरोधात दाखल केलेल्या माझगाव न्यायालयातील खटल्यात शुक्रवारी (ता.20) साक्ष नोंदवली आहे.

संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात साक्ष नोंदवताना नारायण राणेंच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. तसेच यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, राज्यघटनेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, "नारायण राणेंना एकेकाळी आपण शिवसेना चालवत होतो, असं दाखवायचं होतं. पण माझ्यासारखा नेता आणि राज्यसभा खासदाराची बदनामी केल्यानं लोकांचा राज्य घटनेवरील विश्वास उडाल्याचा दावा राऊतांनी केला. यामुळेच आपण न्यायालयात राणेंविरोधात संबंधित खटला दाखल केल्याची साक्ष नोंदवताना म्हटलं.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मानहानीकारक दावा दाखल करण्याबाबत आपली भूमिका न्यायालयासमोर स्पष्ट करतानाच नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर जे आरोप केले, ते अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी माझ्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणं ही माझीच वैयक्तिक बदनामी नसून निवडणूक आयोग भ्रष्ट असल्याचं भासवण्यासारखं आहे,असंही राऊतांनी न्यायमू्र्तींसमोर नमूद केलं.

तसेच नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप करताना संजय राऊत म्हणाले,मी पैसे खर्च करून राऊतांना खासदार केलं असं त्यांचं वक्तव्य म्हणजे थेट भारतीय राज्यघटनेलाच दिलेलं आव्हान असल्याचं सांगितलं. यावेळी राऊतांनी खरंतर राज्यसभा निवडणूक यंत्रणा पारदर्शक असते, परंतु ती भ्रष्ट आहे असल्याचं राणे यांनी भांडूप येथील कोकण महोत्सवातील त्यांच्या भाषणातून निर्माण केल्याची घणाघाती टीका राऊत यांनी न्यायालयासमोर केला.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावतानाच न्यायालयासमोर माझे नाव मतदारयादीत भाग क्रमांक 148 आणि मतदार नोंदणी क्रमांक 1194 वर नोंदवलेले असल्याचं स्पष्ट केलं. तसेच यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान केल्याचंही म्हटलं. उमेदवारी अर्ज भरताना सर्व रकाने व्यवस्थित भरले होते, तरीही माझे नाव मतदारयादीत नव्हते असा खोटा आरोप राणे यांनी केला. याबाबतचे मूळ प्रमाणपत्र आणि छायांकित प्रत राऊत यांनी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली आहे.

याचसोबत माध्यमांमधील यासंबंधीच्या सर्व बातम्यांच्या कात्रणं, न्यूज चॅनेलचे व्हिडिओ आणि पेनड्राइव्हही राऊत यांनी न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणी राणे यांना 2 फेब्रुवारी रोजी कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी त्याला कोणतंही उत्तर दिलं नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय प्रकरण काय...?

भांडुप येथील कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात नारायण राणे यांनी भाषण केलं होतं. त्यात मी संजय राऊत यांना खासदार केले. बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावून राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचे असल्याचं सांगितल्याचा दावा केला होता. त्यानुसार मी कामाला लागलो होतो असंही राणे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं.

तसेच संजय राऊत यांचं नाव मतदारयादीत नव्हतं, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता, मात्र मी मध्यस्थी करून त्यांना निवडून आणले. इतकेच नाही तर त्यांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले, असे धक्कादायक विधान नारायण राणे यांनी केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT