Maharashtra Budget Session : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेत्यांविना अधिवेशन, दोन्ही सभागृहातील पदं रिक्त!

Budget Session Leader of Opposition : विधानसभा आणि विधान परिषदेमधील विरोधीपक्ष नेतेपद रिक्त आहे. त्यांच्या विनाच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे.
Budget Session  Leader of Opposition
Budget Session Leader of Oppositionsarkarnama
Published on
Updated on

Budget Session News : राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार(ता.23) पासून सुरू होणार आहे. 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. मात्र, विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांविना हे अधिवेशन पार पडणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडील कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेत्यापदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. तर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे निवृत्त झाल्याने नव्या विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद देखील रिक्त आहे.

अंबादास दानवे यांच्या निवृत्तीनंतर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला होता. त्यासाठी विधासभा अध्यक्षांकडे निवेदन देखील देण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 10 टक्के इतकी नसल्याचे कारण देत विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Budget Session  Leader of Opposition
Chandrapur Mahapalika News: काँग्रेसच्या निष्ठावंतांच्या निष्ठेवर पाणी! 'स्वीकृत' बाबत प्रदेश काँग्रेस कमेटीचा मोठा निर्णय

10 टक्के सदस्यांविना विरोधी पक्षनेतेपद

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे. जाधव यांनी सांगितले होते की, विरोधी पक्षनेत्यासाठी 10 टक्के सदस्य संख्येची अट नाही. कारण या सभागृहात यापूर्वी 10 टक्के सदस्य संख्या नसताना देखील विरोधी पक्षनेते पद देण्यात आले आहे.

Budget Session  Leader of Opposition
Bishnoi Gang Threat : तुझा गेम करू, काँग्रेस आमदाराला खंडणीसाठी धमकी; बिश्नोई गँगची हिम्मत वाढली, पोलिस प्रशासनाची चुप्पी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com