Chandrapur Mahapalika News: काँग्रेसच्या निष्ठावंतांच्या निष्ठेवर पाणी! 'स्वीकृत' बाबत प्रदेश काँग्रेस कमेटीचा मोठा निर्णय

Maharashtra Pradesh Congress Committe decision in Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेत खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार यांच्यात अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला. काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि भाजपची सत्ता आली.
Chandrapur Municipal Corporation Nominated Councillor Election
Chandrapur Municipal Corporation Nominated Councillor ElectionSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation Nominated Councillor Election: चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीपर्यंत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर चंद्रपूर महानगर पालिकेतील महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवा बद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत बहुमताच्या जवळ असताना काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. महापालिका निवडणुकीत सुरवातीपासूनच आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. या संघर्षात स्वीकृत सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी दोन्ही कडील निष्ठावंतांनी आपली निष्ठा बदलली. मात्र ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेऊ नका, असा निर्णय प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतला आहे. त्यामुळे आता या निष्ठेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत मित्रपक्षांसह काँग्रेसला तब्बल तीस जागा मिळाल्या. त्यानंतर खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार यांच्यात अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला. काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि भाजपची सत्ता आली. तत्पूर्वी धानोरकर खेम्यातील निष्ठावंत वडेट्टीवार गटात दाखल झाले, तर वडेट्टीवारांचे काही समर्थक धानोरकर यांच्या खेम्यात गेले.

माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांची भूमिका लक्षवेधी राहिली. ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत धानोरकरांसोबत होते; मात्र त्यानंतर ते वडेट्टीवारांसोबत दिसले. दुसरीकडे विद्यमान शहराध्यक्ष संतोष लहामगे यांच्यावर कोणत्याही गटाचा शिक्का नव्हता; मात्र या संघर्षात ते धानोरकरांसोबत राहिले. त्यांनी गटस्थापनेसाठी दिलेले पत्र धानोरकर गटासाठी निर्णायक ठरले. त्यामुळे वडेट्टीवारांना गट स्थापन करताना न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ आली.

शेवटी दिल्लीच्या मध्यस्थीने ते एकत्र आले; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. काँग्रेसमधील या सत्तासंघर्षात लहामगे आणि तिवारी यांना दोन्ही गटांकडून महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य म्हणून पाठविले जाईल, अशी चर्चा होती. लहामगे यांना स्वीकृत सदस्य म्हणून खासदार धानोरकरांचा त्याला हिरवा कंदील झेंडी असल्याचे समजते. तिवारी यांनी स्वीकृत सदस्य होण्याची इच्छा नाही, असे अनेकदा बोलून दाखवले आहे; मात्र वडेट्टीवार त्यांना पाठवू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

Chandrapur Municipal Corporation Nominated Councillor Election
Professor Recruitment 2026: प्राध्यापकांसाठी गुड न्यूज! भरती प्रक्रिया पद्धतीत बदल; अडचणीची ठरणारी मोठी अट रद्द

लहामगे आणि तिवारी महाकाली प्रभागातून रिंगणात होते. दोघांचाही पराभव झाला. दरम्यान, ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून पाठवायचे नाही; त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची, असा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास तिवारी आणि लहामगे यांना पुन्हा महानगरपालिकेची पायरी चढण्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्याची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे केवळ चंद्रपूर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांसाठी हा निर्णय लागू करणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे हा निर्णय पक्षाकडून बदलला जाईल, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केला.

Chandrapur Municipal Corporation Nominated Councillor Election
मराठवाड्याचा हुरडा अन् मुंबईचा वडापाव, राष्ट्राध्यक्षांच्या अनोख्या मेजवानीत काय काय होते?

सहा स्वीकृत सदस्य

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्य पाठविण्याबाबत २०२३ मध्ये एक निर्णय झाला. एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के सदस्य स्वीकृत म्हणून पाठविता येणार आहेत. चंद्रपूर मनपात ६६ सदस्य आहेत. दहा टक्के म्हणजे ६.६ सदस्य होतात. ते सात करायचे की सहा ठेवायचे, यासंदर्भात आयुक्त राज्यशासनाकडे अभिप्राय मागविणार आहेत. सध्याची पक्षनिहाय सदस्यसंख्या पाहता सहा स्वीकृत सदस्य गृहीत धरल्यास काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि उबाठा-वंचितचा एक सदस्य स्वीकृत म्हणून मनपात जाईल, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com